Advertisement

कर्तव्याशी प्रामाणिक राहून काम केल्याची इतिहासात नोंद होतें

पहिल्या आदिवासी महीला शिक्षिका गंगुबाई ठोंबरे यांच्या जयंती निमित्ताने पुरस्कार प्रदान
*पालघर :सौरभ कामडी *
                 आपल काम प्रामणिकपणे करत रहा आपल्यास कर्तव्याशी एकनिष्ठ रहा मग बघा आपल्या कामाची नोंद इतिहासात होतें कारण आपल्या भागातील कै गंगुबाई ठोंबरे या पहिल्या आदिवासी महीला शिक्षिका असल्याचे आता समोर आले आहे आजवर याबाबात कोणालाही माहीती नव्हती मात्र त्याच्या नातीने ही सगळी माहिती काढली यांमुळे आज त्यांचा इतिहास आपणं उजागर करत आहोत असे प्रतिपादन उपसभापती प्रदीप वाघ यांनी यावेळी केले. यावेळी आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती कडून गंगुबाई यांच्या नावाने आदर्श शिक्षिका म्हणुन सुर्यमाळ येथील शिक्षिका हेमलता पाटिल यांना आदर्श शिक्षिका पुरस्कार प्रदान करण्यात आला.
       पहिल्या आदिवासीं महिला शिक्षिका कै गंगुबाई ठोंबरे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात १९४० , च्या दरम्यान याभागात कामं केल आजही याभागतील शिक्षणाच्या सुख सोयी रस्ते इमारती यासर्वांची आबाळ असताना त्याकाळात गंगूबाई यांनी केलेलं हे काम नक्कीच दखलपात्र असुन यांच्या नावाने आता दरवर्षी सरकार दरबारी नोंद होईल असा पुरस्कार देण्यात येणार असल्याचा मानस वाघ यांनी यावेळी व्यक्त केला. यावेळी ज्येष्ठ शिक्षक नावळे यांनी याभागातील सुख सोयी वाढवण्यासाठी आजही मोठया प्रमाणावर कामं करणे अपेक्षित आहे तर राज्य पुरस्कार प्राप्त शिक्षक भरत गारे यांनी आदिवासी विकास हक्क संघर्ष समितीचे काम वाखण्याजोगे असुन आदिवासी मधील असे हिरे शोधून त्यांचा सन्मान करणे खरंच मोठ काम असल्याचे त्यांनी सांगतले. 
           या कार्यक्रमास उपस्थित सहाय्यक गटविकास अधिकारी तुषार सूर्यवंशी यांनी त्या काळात एक आदिवासी महीला कोणत्या स्थितीत शिक्षणाचे काम कारीत असेल याचा विचार आज करायला हवा यांमुळे नक्कीच से कार्यक्रम व्हायला हवेत असे मत त्यांनी व्यक्त केले तर पत्रकार हनिफ शेख यांनी शिक्षकी पेशाचे महत्त्व विषद करताना आपल्य पेशाशी सर्वांनी प्रमाणिक राहायला हवे त्याच प्रमाणे असे उपक्रम हाती घ्यायला एक वेगळं मन असाव लागत ते मन या समितीच्या सर्व मंडळीकडे असल्याचं त्यांनी सांगितले यावेळी, कै.गंगुबाई ठोमरे यांची मुलगी प्रमिला जोशी, पंचायत समिती सदस्य लक्ष्मी भुसारा,अनिता पाटील, संतोष पाटील, आदिवासी विकास हक्क संघर्ष समिती चे उपाध्यक्ष मंगेश दाते, रमेश बोटे, संजय वाघ विष्णू हमरे, विठ्ठल गोडे, संजय हमरे सुर्यमाळ सरपंच गीता पाटील,,वाशाळा सरपंच कृष्णा वाघ,किनिस्ते सरपंच योगेश दाते नंद कुमार वाघ, प्रकाश मडके, ठोमरे परीवार चे सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments