*शहाद्याचे तहसीलदार यांना निवेदन; आंदोलनाचा इशारा*
शहादा: आदिवासींची जमीन ताब्यात घेण्याच्या हेतूने आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण करणारे भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नीवर कडक कारवाई करा,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने केली आहे.या मागणीचे निवेदन शहाद्याचे नायब तहसीलदार प्रकाश धनगर यांना देण्यात आले.हेच निवेदन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री व पोलीस अधीक्षक नंदूरबार यांना पाठविण्यात आले आहे.यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,राज्य उपाध्यक्ष गणेश खर्डे,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जलिंदर पावरा,वडगाव अध्यक्ष राहूल चव्हाण,राहुल सुळे,सुरेश ठाकरे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की,जमीन ताब्यात घेण्याच्या हेतूने वाळुंज ता.आष्टी जि.बीड येथे एका आदिवासी महिलेला भाजपचे आमदार सुरेश धस यांच्या पत्नी व काही साथीदारांनी विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना घडली आहे.पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे;अतिशय दुर्दैवी बाब आहे.सदर जमीन ही पीडित महिलेची असतांना मारहाण करून जबरदस्तीने हिसकावण्याचा प्रयत्न होत आहे.गोरगरिबांना त्रास दिला जात आहे.गुंड प्रवृत्तीचा माणसामागे कोण आहे?कायद्याचा राज्यात लोकप्रतिनिधीकडूनच गरिबांना त्रास होत आहे;हे किती दुर्दैव.लोकांचे रक्षक पोलिसांनी आरोपीवर विनयभंग व अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती कायद्यानुसार गुन्हा दाखल करून कडक कारवाई करावी.
भाजप आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नीने आदिवासी महिलेला विवस्त्र करून मारहाण केल्याची घटना एक दुर्दैवी आहे.या घटनेचा आम्ही बिरसा फायटर्स संघटनेतर्फे जाहीर निषेध व्यक्त करतो.सत्ताधारी आमदाराने जनतेने रक्षण करायला पाहिजे,परंतु तेच भक्षक होत आहेत, जनतेला त्रास देत आहेत.आदिवासी महिलेवर हा झालेला अत्याचार आम्ही कदापि सहन करणार नाही.भाजपा आमदार सुरेश धस व त्यांच्या पत्नीवर पोलीस प्रशासनाने तात्काळ अटक करून कडक कारवाई करावी,नाहीतर आम्ही रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करू,अशी तीव्र प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.
0 Comments