Advertisement

शिक्षण विभागाबाबत नाराजी;भ्रष्टाचारावर प्रहार

*बिरसा फायटर्सचे १६ ऑक्टोबरला ठिय्या आंदोलन !*

नंदूरबार:बिरसा फायटर्स संघटनेचे शिक्षण विभागाशी संबंधित विषयावर व भ्रष्टाचारा-यांवर कारवाई करा, या मागणी जिल्हा परिषद नंदूरबार समोर दिनांक १६ ऑक्टोबर २०२३ रोजी ठिय्या आंदोलन होणार आहे.आंदोलनाचे निवेदन जिल्हा परिषद नंदूरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी सावंत कुमार व नंदूरबारचे पोलीस निरीक्षक यांना देण्यात आले आहे. यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हा उपाध्यक्ष साहेबराव कोकणी,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,राजकुमार वळवी आदि कार्यकर्ते उपस्थित होते. 
                      सरकारी शाळा खाजगी कंपन्यांना दत्तक देण्याचा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा,पेसा शिक्षक भरती तात्काळ करण्यात यावी,जिल्हा परिषद शाळेतील रिक्त पदांवर स्थानिक डीएड ,बीएड धारक उमेदवारांची तात्काळ नेमणूक करण्यात यावी,शाळेला पक्की इमारत, वर्गांना स्वतंत्र खोली,शौचालय, पाणी,विज इत्यादी सुविधा देण्यात याव्यात,विद्यार्थांच्या शैक्षणिक विकासाकडे प्राधान्याने लक्ष देण्यात यावे,शाळेत न जाणा-या कामचुकार शिक्षकांवर कारवाई करण्यात यावी,गेल्या ४-५ वर्षापासून शाळेत न येणा-या शिक्षकांची जागा रिक्त करून नवीन शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी,वस्तीशाळेतील निमशिक्षकांना सेवेत सामावून घ्यावे,शिक्षकांचे पगार, फरकबीले मंजूर करण्यास दिरंगाई करणा-या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात यावी,जिल्हा परिषद व पंचायत समितीशी संबंधित विविध योजनांपासून लाभार्थ्यांना वंचित ठेवणा-या अधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी करून निलंबनाची कारवाई करावी,जिल्हा परिषद व पंचायत समितीसंबंधित विविध योजनांत,निधीत भ्रष्टाचार करणा-यांवर कडक कारवाई करण्यात यावी,अशा विविध मागण्यांसाठी दिनांक १६/१०/२०२३ रोजी दुपारी १ वाजता जिल्हा परिषद नंदूरबार समोर ठिय्या आंदोलन केले जाणार आहे.

Post a Comment

0 Comments