Advertisement

अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पालघर यांची आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची हत्या नंतर उपस्थित झालेल्या विषयावर चर्चा


अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद पालघर यांची आश्रम शाळेतील विद्यार्थीनीची हत्या नंतर उपस्थित झालेल्या विषयावर चर्चा

पालघर :सौरभ कामडी 
पालघर जिल्ह्यातील मोखाडा तालुक्यात असलेले रयत शिक्षण संस्थेचे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रम शाळा मोखाडा येथे दिनांक .०६ ऑक्टोबर २०२३ रोजी ई.१२ विज्ञान मध्ये शिक्षण घेत असलेली आदिवासी भगिनी अर्चना उदार हीची आरोपी प्रभाकर वाघेरा (वय 22 वर्षे) या इसमाने धारदार शस्त्राने गळ्यावर वार करून निर्घृण हत्या केली नंतर आरोपीने सुद्धा गळफास घेऊन आत्महत्या केली होती त्या घटनेबाबत सविस्तर चौकशी करून सदरील भगिणीच्या परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे महाराष्ट्र प्रदेश युवाध्यक्ष इंजि.गणेशभाऊ गवळी यांच्या नेतृत्वात दि.०७ ऑक्टोबर २०२३ रोजी सविस्तर चर्चा करून महत्व पुर्ण निर्णय घेण्यात आले आणि ज्या ज्या गोष्टींची आवश्यकता आहे त्या सर्व गोष्टींची पूर्तता करण्यासाठी तत्काळ संस्थेच्या अधिकाऱ्यांना, मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापण कमिटीला आदेश देवून लेखी स्वरूपात पत्र घेण्यात आले त्याच बरोबर सदरील भगिनीच्या परिवारास सांत्वनपर भेट देवून संस्थेकडून आणि आदिवासी विकास विभागाकडून जास्त रकमेची मदत द्यावी असे स्पष्ट आदेश प्रदेश अध्यक्ष इंजि.गणेशभाऊ गवळी यांनी चर्चे दरम्यान संस्थेचे विभागीय अधिकारी आर.पी.ठाकूर सर आणि आदिवासी विकास विभाग जव्हार प्रकल्पाचे सह.प्रकल्प अधिकारी (शिक्षण) परदेशी सर,मुख्याध्यापक शेळके सर, आणि शालेय व्यवस्थापन समितीचे स्थानिक लोकप्रतिनिधी सदस्य नवसु दिघा साहेब यांना दिले या वेळी अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद चे मार्गदर्शक दिनकर वाढाण साहेब, पालघर जिल्हा युवाध्यक्ष रामदासभाऊ हरवटे, उपाध्यक्ष राजारामभाऊ कोरडा,नाशिक जिल्हा कमिटी चे बिरसा मुकणे, जयवंत हगोटे त्रिंबक तालुका अध्यक्ष, उत्तम लिलके, गोविंद बदादे, दिनकर कावरे, लखन जाधव, राहुल बोरसे, ठाणे जिल्हा युवा सचिव मंगळुभाऊ भला,मोखाडा तालुका अध्यक्ष मकलासभाऊ पढेर आणि सर्व युवा व ज्येष्ठ सहकारी, पालघर तालुका अध्यक्ष प्रतापभाई पाडोसा,जिल्हा संपर्क प्रमुख मुकेश भाऊ पाडोसा, सहसंपर्क प्रमुख समिरभाऊ डवला,देविदासभाऊ दिघा, सुनिलभाऊ आरडे व मोखाडा तालुका कमिटी उपस्थित होते चर्चे करीता मोखाडा पोलीस स्टेशन चे सहा.पोलीस निरीक्षक संजय धुसाळ साहेब यांनी मोलाचे सहकार्य करून सदरील भगिनीच्या परिवारास न्याय मिळवून देण्यासाठी खऱ्या अर्थाने मोलाचे योगदान दिले त्या बद्दल अखिल भारतीय आदिवासी विकास परिषद जिल्हा शाखा पालघरच्या वतीने आभार माणून चर्चा खुपच दुःखद अश्या वातावरणात मोठ्या शांतेत पार पडली.

Post a Comment

0 Comments