Advertisement

बिरसा फायटर्समुळे मागण्या मान्य; सुतगिरणी कामगारांनी मानले आभार!

शहादा:बिरसा फायटर्सचे अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व त्यांच्या सहका-यांनी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहादा यांना दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी दिलेल्या निवेदनाची दखल घेण्यात आली.उपविभागीय दंडाधिकारी शहादा यांनी व्यवस्थापक संचालक लोकनायक जयप्रकाश नारायण शेतकरी सहकारी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ तालुका शहादा जिल्हा नंदूरबार यांना सुतगिरणीतील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करून कामगारांच्या बेमुदत संपातील १ ते २५ मागण्यांबाबत योग्य ती उचित कार्यवाही करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. पत्राचा सुतगिरणी प्रशासनावर दबाव निर्माण झाला तसेच पत्रकार सुशिलकुमार पावरा यांनी दिनांक २२ ऑगस्ट २०२३ पासून सुतगिरणीतील कामगारांनी सुरू केलेला बेमुदत संपाचे शेवटपर्यंत बातम्यांद्वारे रोजचे अपडेट घेत पाठपुरावा सुरूच ठेवला.त्या बातम्यांचाही प्रशासनावर परिणाम जाणवला.यापूर्वीही दिनांक २२ ऑगस्ट २०२३ रोजी बिरसा फायटर्सने शहाद्याचे तहसीलदार यांना कामगारांच्या मागण्यांबाबत निवेदन दिले होते व संपाच्या ठिकाणी येऊन कामगारांना जाहीर पाठिंबा दिला होता.
            चालु वर्षाचा ५ महिन्यांचा पीएफ भरला आहे, माहे ऑगस्ट पासून इंडेक्स नंबर लावणार आहेत, माहे सप्टेंबर पासून एक पगारी रजा लावणार आहेत, बदली कामगारांना कायम स्केल लावणार आहेत, सन २०२१ ते २०२२ व चालू वर्षाचा बोनस दिनांक ८ ते ९ नोव्हेंबर रोजी देणार आहेत, कामगारांना प्रत्येक महिन्याचा पगार ५ ते ६ तारखेला देणार, माहे ऑगस्ट पासून प्रत्येक महिन्याचा पीएफ १५ ते १७ तारखेला भरणार, मागील वर्षीचा बोनस चेक दिनांक ३० ऑगस्ट ला दिला आहे. अशा एकूण ६ मागण्या मान्य करण्यात आल्या आहे. म्हणून दिनांक ३१ ऑगस्ट २०२३ रोजी सुतगिरणी कामगार युनियनतर्फे सुशिलकुमार पावरा यांना पुष्प देऊन आभार मानण्यात आले.यावेळी अध्यक्ष जगन निकुंभ, उपाध्यक्ष रामदास पाटील, सदस्य दिलीप सोनवणे व कामगार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments