Advertisement

छत्रपती संभाजी नगर जिल्हा समन्वयक पदी रामसिंग महाजन सर यांची निवड

श्री रामसिंग महाजन सर रा.शंकरपूर ता. गंगापूर यांची शिक्षक फाऊंडेशन द्वारा संचालित महाराष्ट्र शिक्षक पॅनल छत्रपती संभाजी नगर जिल्हा समन्वयक पदी निवड करण्यात आली.
श्री दीपक चामे सर , श्री सतीश कोळी सर , श्री रंगनाथ सगर सर , विकी येलमटे सर , श्री रामसिंग महाजन सर यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्र शिक्षक पॅनल शैक्षणिक व्हॉट्स ॲप गृपवर विद्यार्थी व शिक्षक यांना युट्यूब चॅनल व्हिडिओ , शैक्षणिक पीडीएफ फाईल, ऑनलाईन व ऑफलाईन चाचण्या , परीक्षा, शिक्षकांसाठी तंत्रस्नेही संमेलन , कवी संमेलन , शिक्षणाची वारी असे विविध प्रकारचे उपक्रम राबविण्यासाठी 2014 पासून आजपर्यंत अथक परिश्रम घेतले जात आहेत.लॉकडाऊन काळात विद्यार्थी व शिक्षक सर्वांना महाराष्ट्र शिक्षक पॅनल शैक्षणिक समूहाच्या वतीने फ्री मध्ये अनमोल माहिती पुरवली गेली होती.
भविष्यात विद्यार्थी व शिक्षकांसाठी विविध स्पर्धा आणि उपक्रम राबविण्यासाठी श्री रामसिंग महाजन सर यांच्यावर जबाबदारी देण्यात आली आहे. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील छोटेसे गाव म्हणजे शंकरपूर या गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षण घेतलेले हे सर आज या पदापर्यंत पोहोचले. या शाळेने त्यांना घडवलं व ते आज विद्यार्थी घडवत आहेत. रामसिंग महाजन सर यांचे आज शंकरपूर येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये गावाच्या वतीने मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात यावेळी.सरपंच करुणा ताई पोळ, उपसरपंच उदल काका कहाटे, ग्राम सेवक थोरात साहेब, तंटामुक्ती अध्यक्ष कैलास तात्या पोळ, ग्राम पंचायत सदस्य, सुनील भाऊ पोळ, कविता ताई गायकवाड, पदम काका काहाटे, जीजा बाई बर्डे, संतोषी ताई काहाटे, द्वारका बाई पवार, तसेच शालेय समिति अध्यक्ष, रमेश भाऊ आहेर, शाळेचे मुख्य ध्यापक निरपगारे सर, कैलास पोटे, रफिक भाई, रहमान तांबोळी, किरण महाजन, गणेश कहाटे, लतीफ शाह,दीपक कहाटे.प्रेम राजपूत, पन्नालाल भाऊ.शाळेचे सर्व शिक्षक वर्ग आदर्श पालक वर्ग, महिला वर्ग, पुरुष वर्ग लहान बालके, यांनी मोठ्या प्रमाणात हाजिरी लवली, एक नवीन उपक्रम म्हणून हल्ली च वैजापूर येथील टीम सोबत रामसिंग महाजन सरांनी रोबोटिक क्रेन तयार केले आहेरोबोटिक आणि कोडिंग प्रशिक्षण शासकीय अध्यापक विद्यालय औरंगाबाद येथे आयोजित करण्यात आले होते. कृतिशील तंत्रस्नेही शिक्षक श्री रामसिंग महाजन सर, श्री लावरे सर सर जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घायगाव ता वैजापूर आणि इतर शिक्षक उत्साहाने सहभागी झाले होते.
रोबोटीक कार आणि रोबोटिक क्रेन तयार करण्यात आले. आता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाजगी इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये मिळणाऱ्या शैक्षणिक साहित्य सुविधा उपलब्ध करून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा अवलंब करण्याचा संकल्प श्री रामसिंग महाजन सर यांनी केला आहे.

Post a Comment

0 Comments