Advertisement

पालघर मध्ये ए एस के फाऊंडेशन चा रानभाजी मेळावा


शेतकऱ्यांनी शेतमाल किंवा रानभाज्या पिकवता मग ते विकायलाही शिका - प्रदीप वाघ
पालघर :सौरभ कामडी 
दिनांक 29 ऑगस्ट 2023 रोजी ए.एस.के. फाऊंडेशन मुंबई पुरस्कृत समृद्ध किसान प्रकल्प, प्रकल्प कार्यान्वयन संस्था बायफ मार्फत रानभाजी महोत्सव घेण्यात आला होता या महोत्सवास विविध प्रकारच्या एकूण 40 ते 50 रानभाज्यांचे स्टॉल लावण्यात आले होते, कार्यक्रमास सायदे, जोगल वाडी, करोळ आणि पाचघर आदी गावातील महिलांनी सहभाग नोंदवला होता. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उप सभापती प्रदीप वाघ पंचायत समिती मोखाडा, नरेंद्र येले सरपंच ग्रुप ग्रामपंचायत करोळ पाचघर, तसेच उपसरपंच परशुराम आगिवले, ग्रामपंचायत वाकडपाडा येथील उपसरपंच नंदकुमार वाघ, ग्रामपंचायत सदस्य आशाताई भस्मे, नाबार्ड पुरस्कृत, पाणलोट विकास क्षेत्र व झरे विकास प्रकल्प उधळे येथील सचिव परशुराम गवारी, स्पार्क फाऊंडेशन चे प्रकल्प समन्वयक नितीन पिठोले, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पाचघर चे मुख्याध्यापक प्रभाकर वाघमारे सर व काशीद मॅडम, तसेच बायफ संस्थेचे पालघर जिल्ह्याचे विभागीय आधिकारी प्रदीप खोसे, प्रकल्प प्रमुख प्रशांत बोराडे, दिपक नजन, दिनेश महाले, अनिल पालवे, शिक्षण मित्र लक्ष्मण झुगरे, करोळ पाचघर ग्रुप ग्रामपंचायत चे कृषि सहाय्यक शिंदे, शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट, केळवे येथील हितेंद्र राऊत अध्यक्ष, ॲड. हेमप्रकाश तरडे विश्वस्त, भूषण सावे व विजय सावे, प्रसिद्ध तारपा वादक भिकल धिंडा, सामाजिक कार्यकर्ते,आदी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी नंदकुमार वाघ यांनी रान भाज्या महोत्सव हा उपक्रम कसा उपयुक्त आहे याबद्दल माहिती दिली, त्यानंतर नरेंद्र येले यांनी सांगितले की, रान भाजी हा महोत्सव गावा पुरता मर्यादित नसून सर्व शेतकऱ्यांनी सर्व रानभाजी ची माहिती घेऊन विक्री सुरू केली पाहिजे, त्यानंतर बायफ संस्थेचे पालघर जिल्ह्याचे विभागीय अधिकारी खोसे यांनी आपल्या भाषणात शेतकऱ्यांनी रानभाजी चे आरोग्यदायी महत्त्व, व ए.एस.के.फाउंडेशन च्या समृद्ध किसान प्रकल्पा अंतर्गत शेतकऱ्यांनी लागवड केलेल्या मोगरा व आंबा, काजु हे एक उत्पादनाचे साधन आहे व त्यावर चांगल्या प्रकारे मेहनत घेतली पाहिजे हे त्यांनी शेतकऱ्यांना पटवून दिले, नंतर रानभाजी महोत्सव कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रदीप वाघ साहेबांनी ज्या रानभाज्या संपुष्टात येऊ राहिल्यात त्यांची शेतकऱ्यांनी जोपासना केली पाहिजे, रानभाजी चे आरोग्यदायी महत्व व रानभाजी ची विक्री महिलांनी शहरामध्ये केली तर कुटुंबाचा उदरनिर्वाह चालवत येईल, रानभाज्या ची रोपवाटिका देखील खूप महत्वाची आहे हे उपस्थितांना मार्गदर्शन सांगितले. शितलादेवी व हनुमान मंदिर देवस्थान ट्रस्ट मार्फत गरजु महिलांना साडी वाटप करण्यात आली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रशांत बोराडे, तर आभार प्रदर्शन दिनेश महाले यांनी केले.

Post a Comment

0 Comments