Advertisement

जय आदिवासी ब्रिगेडचा सुतगिरणी कामगारांच्या संपास जाहीर पाठिंबा!

शहादा: सुतगिरणी कामगारांनी सुरू केलेल्या बेमुदत संपाला जय आदिवासी ब्रिगेड संघटनेचा जाहीर पाठिंबा देण्यात आला आहे व सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी संपाचे बॅनर फाडून कामगारास मारहाण केली,या घटनेचा जाहीर निषेध व्यक्त केला आहे.बिरसा फायटर्स संघटनेबरोबर जय आदिवासी ब्रिगेड संघटनेने पाठिंबा दिल्यामुळे सुतगिरणी कामगारांना मोठा आधार मिळाला आहे.पाठिंबा पत्र सुतगिरणीचे युनियन अध्यक्ष जगन निकुंभ व शहाद्याचे तहसीलदार यांना देण्यात आले.यावेळी जय आदिवासी ब्रिगेडचे शहादा तालुकाध्यक्ष अनिल पवार, उपाध्यक्ष सुरेश ठाकरे,जिल्हा मिडीया प्रचारक अनिल पावरा,शहादा शहर प्रमुख ललित शेवाळे व इतर कार्यकर्ते उपस्थित होते. 
             पत्रात म्हटले आहे की, दिनांक २२/०८/२०२३ पासून आपल्या विविध मागण्यांसाठी सुतगिरणीतील कामगारांनी बेमुदत संप सुरू केला आहे.त्यामुळे सुतगिरणी बंद अवस्थेत आहे. सन २०१७ पासून आजपर्यंत थकित असलेला ५-६ वर्षांचा पिएफ आम्हाला मिळावा,मागील वर्षांचा व या वर्षीचा बोनस मिळावा,दवाखाना बंद आहे तो सुरू करावा,कॅन्टीन बंद आहे ते सुरू करावे,पिण्याच्या पाण्याची सोय करावी, अशा विविध मागण्यांसाठी बेमुदत संप करीत आहेत.या संपास आम्ही जय आदिवासी ब्रिगेड संघटनेतर्फे जाहीर पाठिंबा देत आहोत.
                  दिनांक २४/०८/२०२३ रोजी सुतगिरणीचे एमडी राजाराम दुल्लभ पाटील यांनी बेमुदत संपाचे बॅनर फाडून कामगारास मारहाण केली,या घटनेचा आम्ही जाहीर निषेध व्यक्त करतो.तुम्हाला कुठल्याही प्रकारची मदत आवश्यक असेल तर आम्ही करू,तुमच्या या लढ्याला आम्ही शेवटपर्यंत साथ देऊ,अशी प्रतिक्रिया जय आदिवासी ब्रिगेडचे जिल्हा मिडीया प्रचारक अनिल पावरा यांनी दिली.

Post a Comment

0 Comments