Advertisement

एमडी राजाराम पाटील यांच्या भ्रष्टाचाराची चौकशी होणार!उपविभागीय दंडाधिकारी शहादा यांचे आदेश

एमडी राजाराम पाटील यांनी कामगारांचे व शेतक-यांचे पैसे लुबाळले: सुशिलकुमार पावरा
शहादा: लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ ता.शहादा जि.नंदुरबार येथील एमडी श्री. राजाराम दुल्लभ पाटील,उपकार्यकारी संचालक श्री.उत्तम संभू पाटील व सहका-यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची,आर्थिक गैरव्यवहाराची सखोल चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करा,त्यांना पदावरून हटवा व कामगारांच्या बेमुदत संपाच्या मागण्या पूर्ण करा,अशी मागणी बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदूरबार संघटनेकडून उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी शहादा यांच्याकडे दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजी एका निवेदनाद्वारे करण्यात आली होती.त्या निवेदनाची दखल उपविभागीय दंडाधिकारी शहादा सुभाष ए दळवी यांनी घेतली आहे.
          उपविभागीय दंडाधिकारी यांच्या पत्रात नमूद करण्यात आले आहे की,श्री.सुशिलकुमार पावरा,संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष,इंटरनॅशनल आयडॉल व राष्ट्रीय कलामित्र बिरसा फायटर्स व इतर पदाधिकारी यांनी दिनांक २८ ऑगस्ट २०२३ रोजीच्या निवेदनाद्वारे लोकनायक जयप्रकाश नारायण सहकारी शेतकरी सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ तालुका शहादा जिल्हा नंदूरबार येथील कार्यकारी संचालक श्री.राजाराम दुल्लभ पाटील, उपकार्यकारी संचालक उत्तम दुल्लभ पाटील व सहका-यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची,आर्थिक गैरव्यवहाराची चौकशी करून दोषींवर कायदेशीर कडक कारवाई करून पदावरून हटविणे व कामगारांच्या बेमुदत संपाच्या १ ते २५ मागण्या पूर्ण करणेबाबत इकडे निवेदन सादर केले आहे.सोबतच्या निवेदनाची छायांकित प्रत जोडण्यात आली असून निवेदनात नमूद केलेल्या बाबींची सविस्तर चौकशी करून, नियमानुसार योग्य ती उचित कार्यवाही करावी व केलेल्या कार्यवाहीचा अहवाल इकडेस सादर करावा,असा आदेश उपविभागीय दंडाधिकारी शहादा सुभाष दळवी यांनी व्यवस्थापक संचालक सुतगिरणी कमलनगर उंटावद होळ तालुका शहादा जिल्हा नंदूरबार यांना दिले आहेत.
              त्यामुळे भ्रष्टाचारांचे धाबे दणाणले असून आपल्यावर होणा-या कारवाईला घाबरून एमडीने कामगारांच्या ६ मागण्या मान्य केल्याचे बोलले जात आहे.एमडी राजाराम पाटील, उपकार्यकारी संचालक उत्तम पाटील व सहका-यांनी सुतगिरणीतील कामगारांचे व शेतक-यांचे लाखों रुपये लुबाळले असून ते त्यांना परत मिळावेत,व दोषींवर कायद्यानुसार कारवाई करावी,तरच भ्रष्टाचाराला आळा बसेल, अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी दिली आहे.सुतगिरणीतील भ्रष्टाचा-यांवर  
कोणती कारवाई होईल, याकडे कामगारांचे व शेतक-यांचे लक्ष लागून आहे.

Post a Comment

0 Comments