Advertisement

सावर्डे शाळेच्या मुलांना भोजनासाठी शेड बांधून मिळणार मुख्याध्यापकांच्या प्रयत्नांना गावकऱ्यांनी दिली साथ

पालघर:सौरभ कामडी *जिल्हा परिषद शाळा सावर्डे ही पालघर जिल्हा व मोखाडा तालुक्यातील अतिषय दुर्गम शाळा असून येथे 2019 पर्यन्त गावात जाण्यासाठी रस्ता नव्हता . सावर्डे येथे पहिली ते पाचवी पर्यंत शाळा असून शंभर टक्के आदिवासी विद्यार्थी आहेत .या शाळेचे मुख्याध्यापक संतोष बोंद्रे सर यांनी ग्रामस्थांना व ग्रामपंचायत माजी सरपंच हनुमान पादीर यांना सांगितले की मध्यान्ह भोजनासाठी विद्यार्थ्यांना एक सेड बांधून मिळावा या विनंतीला मान राखून शाळा व्यावस्थापन समिती अध्यक्ष माजी सरपंच हनुमान पादिर व ग्रामस्थ ,ग्रामसेवकठोंबरे यांनी विद्यार्थ्यांना भोजनासाठी शेड उभारण्यासाठी तयारी दर्शवून आज त्याचे काम सुरू करण्यात आले. गेल्या तीन वर्षांमध्ये शाळेचे मुख्याध्यापक शाळा संतोष बोंद्रे सर यांनी विविध संस्थांच्या मार्फत विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य शाळेचे अंतरंग -बाहेरंग ,रंगोटी शाळेचे इमारतीचे नूतनीकरण विद्यार्थ्यांसाठी सुलभ शौचालय तसेच कोरोना काळात गावातील 87 कुटुंबांना किराणा सामान असे अनेक उपक्रम राबविले. असून, एक अतिशय दुर्गम सावर्डे शाळा आयएसओ होण्याचं मानांकन मिळाले. तसेच मोखाडा तालुक्यातील सामाजिक बांधिलकी जपताना पाड्या -वस्त्यावरील गरीब गरजू महिलांना दोन किलोमीटरवर डोक्यावर पाणी आणावे लागत असल्याने पाणीटंचाई असणाऱ्या गावांना वॉटर व्हील माहुली संस्थेला विनंती करून वाटप करण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांची गुणवत्ता व उपस्थित वाढवण्यासाठी मोखाडा तालुक्यातील दहा शाळांना स्मार्ट टीव्ही माऊली संस्थेकडून मिळवून दिल्या. तसेच विविध शाळांना शैक्षणिक साहित्य इतर संस्थेकडून मिळून देत, अशा विविध उपक्रमाच्या माध्यमातून , आपल्या गोरगरीब आदिवासी विद्यार्थ्यांना एक मदतीचा हात म्हणून उपक्रम राबवण्याच प्रयत्न संतोष बोंद्रे सर यांनी केल्याने सर्व स्तरातून त्यांचे कौतुक होत आहे. तसेच आपल्या मुलीचा वाढदिवस साध्या पद्धतीने साजरा शाळेत करत कारेगाव काष्टी वावळ्याची वाडी करोळ पोराचा पाडा कामडवाडी अशा शाळांना शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले.

Post a Comment

0 Comments