Advertisement

समान नागरी कायद्याला बिरसा फायटर्सचा विरोध;११ जुलैला सर्व जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देणार


तळोदा(प्रतिनिधी)देशात समान नागरी कायद्याविरोधात संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष सुशीलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली बिरसा फायटर्सची झूम मिटिंग घेण्यात आली.समान नागरी कायद्यामुळे आदिवासींची निसर्गनिगडित रूढी-परंपरा,चालीरिती,लग्न परंपरा,सण -उत्सव यावर गदा आणून आदिवासींची सांस्कृतिक ओळख संकटात येऊ शकते. तसेच,जंगल-संपत्ती जमिनीवर हक्क,छोटा नागपूर कायदा,५ वी ६ वी अनुसूची कमजोर करून आदिवासींचे संवैधानिक हक्क,अधिकार हिरावून घेण्याचे कट कारस्थान केंद्र सरकार करत आहे.समान नागरी कायदा लागू करू नये यासाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना ११ जुलैला निवेदन देणे व आदिवासीबहुल भागातील ग्रामपंचायतीत ठरावासाठी पत्र पाठवणे.ठराव पत्र केंद्राला पाठवण्याचे ठरले.यावेळी राज्यमहासचिव राजेंद्र पाडवी,उपाध्यक्ष गणेश खर्डे,सचिव संजय दळवी,नाशिक कार्याध्यक्ष विजय सहारे,नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,गंगानगर शाखाध्यक्ष सायसिंग पाडवी,चंद्रसिंग तडवी, दिलीप वळवी,कवीराज तडवी,जितु पावरा,विजायंती पावरा,बिरबल पावरा,भूला पावरा,गमसिंग भाई व मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments