Advertisement

बिरसा फायटर्सचे प्रभूदत्तनगरमधील रस्त्यासाठी निवेदन

सरपंच व ग्रामसेवक यांच्याकडे रस्त्याची मागणी

शहादा:प्रभूदत्तनगरमधील घर क्रमांक 72 ते 78 व 177 ते 186 समोरील 6 मीटरचा रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स संघटनेकडून ग्रामपंचायत होळ उंटावदचे सरपंच राहूल ठाकरे व ग्रामसेवक महेशकुमार चौधरी यांच्याकडे एका निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
      निवेदनात म्हटले आहे की,आम्ही प्रभूदत्तनगर येथे गेल्या अनेक वर्षांपासून राहत आहोत. ग्रामपंचायत होळ मोहिदा तर्फे शासनाच्या विविध योजनेतून प्रभूदत्तनगरला सिमेंट काँक्रिटचे रस्ते बनवण्यात आले आहेत. परंतु प्लाॅट नंबर 72 ते 78 व 177 ते 186 समोरील 6 मीटरचा रस्ता अद्याप बनविण्यात आला नाही.त्यामुळे आम्हाला दळणवळण करण्यास अनेक अडचणी येत आहेत. शिवाय रस्त्याच्या नियोजित जागेवर सूतगिरणी हद्दीत राहणारे कामगारांच्या घरातील सांडपाणी साचून आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरत आहे.त्यामुळे आम्हा रहिवाशांना सदर रस्त्यावरून जाताना नाकावर रूमाल धरून ये जा करावे लागत आहे.रस्त्यावरून येता जातांना आम्हा रहिवाशांना खूपच त्रास होत आहे. सदर रस्ता लवकरात लवकरात झाल्यास आम्हा रहिवाशांना व पादचा-यांना पायी येण्या जाण्याची,चार चाकी,दुचाकी वाहनाने येण्या जाण्याची सोय होईल व इतर अनेक अडचणी दूर होतील, म्हणून ग्रामपंचायत तर्फे लवकरात लवकर रस्ता सिमेंट काँक्रिटीकरण करून तयार करण्यात यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून करण्यात आली.
              यावेळी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा व गुलाबसिंग पावरा,उदयसिंग पावरा,हर्षल पावरा आदि कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनावर 22 जणांनी सह्या केल्या आहेत.

Post a Comment

0 Comments