Advertisement

वनस्पती जडीबुटी व्दारे अनेक आजार बरे करणारे रामा लखमा रंधा यांचे वयाच्या ९० व्या वर्षी निधन

  पालघर , प्रतिनिधी सौरभ कामडी 

जव्हार तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कौलाळे पैकी टोखर खांड या गावचे रहिवासी वनस्पतीच्या साह्याने कावीळ,मुतखडा, अर्धशिशी,लकवा अशा अनेक आजारावर उपचार करणारे कै .रामा लखमा रंधा यांचे आज दि २९ जुन २०२३ रोजी वयाच्या ९० व्या वर्षी निधन झाले. त्यांना गावठी उपचार पद्धतीची माहिती असल्यामुळे त्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात वनस्पती व जडीबुटी व्दारे उपचार करण्यासाठी धुळे, नंदुरबार, नाशिक, इगतपुरी घोटी,अशा लांब लांबच्या ठिकाणाहून उपचार घेण्यासाठी लोक येत होते. संपूर्ण कौलाळे ग्रामपंचायती मध्ये त्यांनी वारकरी संप्रदायाचा मूळ पाया रचला. गावोगावी जाऊन वारकरी संप्रदाय वाढवला. तसेच त्यांनी गोरगरीब जनतेला नेहमीच मदतीला हात दिला. त्यांच्यावर आज टोकरखाड या मुळगावी अंत्यसंस्कार करण्यात आले.ते जव्हार प़चायत समिती चे माजी सभापती तथा विद्यमान सदस्य चंद्रकांत रंधा यांचे वडील होते.

Post a Comment

0 Comments