Advertisement

धडगाव तालुक्यातील पाडली, बोरकीपाडा येथील अंगणवाडी केंद्रातील गरोदर माता, लहान बाळांना पूरक पोषण आहार महिन्यात किती वाटप करण्यात येते याची चौकशी करावी अशी मागणी मिरयम वळवी यांनी केली

दि. ०४ जूलै २०२३

प्रकाश नाईक,नंदुरबार प्रतिनिधी

नंदुरबार (धडगाव ) :- धडगाव तालुक्यातील पाडली बोरकीपाडा या अंगणवाडी केंद्रातील गरोदर माता आणि लहान मुलांना पुरक पोषण आहार एकात्मिक बाल विकास केंद्रातुन किती प्रमाणात पुरवठा करण्यात आला ते महिन्यानुसार माहिती देण्यात यावी व महिन्यानुसार आपल्या अंगणवाडी केंद्रातून किती वाटप करण्यात येते त्याची लेखी स्वरूपात सविस्तर माहिती देण्यात यावी. मा.सहा. आयुक्त आरोग्य आणि पोषण तथा जन माहिती अधिकारी एबाविसेयो महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांच्याकडे मागणी केली आहे. तसेच मा. सहा. आयुक्त आरोग्य व पोषण तथा जन माहिती अधिकारी एबाविसेयो महाराष्ट्र राज्य नवी मुंबई यांनी सदरचा अर्ज या कार्यालयाकडे वर्ग केला आहे.
तसेच संबधित अर्जातील माहिती बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खुंटामोडी ता. धडगाव जि. नंदुरबार यांच्याशी संबंधित असल्याने सदर अर्जाबाबत माहिती आपणास देण्याबाबत बाल विकास प्रकल्प अधिकारी एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प खुंटामोडी ता. धडगाव जि. नंदुरबार हे सक्षम असल्यामुळे पुढील माहिती अधिकारी अधिनियम २००५अन्वये कलम ६( ३)अन्वये कार्यवाहीस्तव हस्तांतरीत करण्यात येत आहे.

धडगाव पाडली, बोरकीपाडा येथील अंगणवाडी सेविका व राजकुमार आयडे (CDOP) हे गेल्या एप्रिल महिन्यापासून झोपेत आहे त्यांना कधी जाग येणार असा प्रश्न पडतोय?सामाजिक कार्यकर्त्या मिरयम वळवी यांना प्रश्न पडतोय तरी शासनाने या विषयावर दखल घेऊन न्याय मिळवून द्या द्यावे ही विनंती आहे. माता मृत्यू व बाल मृत्यू हा का? वाढतोय असल्या हलगर्जी पणामुळे वागणाऱ्या अधिकाऱ्यांवर व कर्मचारी यांच्यामुळे वाढतोय. यांच्यावर योग्य ती चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी मिऱ्याम वळवी यांनी केली आहे.

Post a Comment

0 Comments