Advertisement

मनीपुर येथील दोन महिला व त्यांचे कुटुंबियावर झालेल्या अन्यायाविरोधात न्याय मागणीसाठी राष्ट्रपती,पंतप्रधान, मनीपुर मुख्यमंञी बिरेनसिंह यांना जिल्हाधिकारी गोंदिया मार्फत बिरसा फायटर्स संघटनेचा उलगुलानार्थ निषेध निवेदन सादर.

गोंदिया (२६) मनीपुर राज्यातील कांगपोकळी येथे उसळलेल्या व जाळपोळ हिंसाचारात बळी गेलेल्या आदिवासी महिलांचे बलात्कार व असंवेदनशिल,समाज व सरकारच्या मानुसकीला पाझर फोडणारी घटणा देशभर गाजत आहे.याचे पडसाद विदेशात उमटत आहेत याविरोधात ७७ दिवसानंतर न्याय न मिळाल्याने अन्यायी सरकार झोपी गेली व गुन्हेगार कसे काय मोकाट सुटले आहेत.? याचे जाब विचारून त्यांचेवर आदिवासी अन्याय अत्याचार प्रतिबंधक अँक्टनुसार गुन्हा नोंद व्होवा व त्यांना फाशी देण्यात यावी या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सच्या नेतॄत्वात जिल्हाधिकारी गोंदिया यांना निवेदन सादर करण्यात आले त्यावेळी एस जी उईके प्रदेशाध्यक्ष,विदर्भ,राकेश सोयाम महासचिव विदर्भ मिलींद कुंभरे संचालक एपीएमसी तिरोडा,संघटनेचे जिल्हाअध्यक्ष भोजराज उईके,तालुका अध्यक्ष दिलिप कोडवते,सलिम मरस्कोल्हे,राकेश कुंभरे युवाध्यक्ष,विनोद उईके महासचिव,तिरोडा दुर्गेश कळपती जंगल जिल्हा संघ अध्यक्ष,व पदाधिकारी हजर होते.या घटनेचे गांभिर्य जाणुन सरकार संवेदन शिल नाही यात दोषी.पोलीस प्रशासन व गुन्हेगार एका थालीचे चट्टे बट्टेतर नाही असे आदिवासीचे लेखक पञकारांचे जोरसोरपणे संघटणाचे म्हनने आहे भाजपाशासित प्रदेशात आदिवासी सुरक्षित नाही याचा अर्थ राजकीय पातळीवर गुन्हेगार सरकारला घाबरत नाहीत वा ते सरकारला काहीच समजात नाहीत याविषयी गुन्हे घडने व थांबविण्यास सरकार सपशेल अयश्सवी ठरल्याने तेथील सरकारला सत्तेत राहण्याचा हक्क नाही तेथे राष्ट्रपती शासन लावावे व गुन्हेगारास फाशी देण्यात यावी अन्यथा आदिवासी समाज व संघटणा रस्त्यावर उतरतिल व जशास तसे उत्तर देईल याला जबाबदार शासन प्रशासन राहील अशा प्रकारे बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे यांनी आँनलाईन फोन काँम्फ्रंसवर कार्यकर्त्याशी चर्चेवर  बोलतांनी सरकारला संदेश दिला आहे.

Post a Comment

0 Comments