Advertisement

बिरसा फायटर्सचा दणका; वडगाव आरोग्य केंद्रात आरोग्य सेविकेची नियुक्ती

ठिय्या आंदोलनातून बिरसा फायटर्सचा स्वच्छतेचा संदेश!
शहादा( प्रतिनिधी) : वडगाव तालुका शहादा जिल्हा नंदुरबार येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे त्वरित भरा,या मागणीसाठी बिरसा फायटर्स गाव शाखा वडगाव संघटनेच्या वतीने आज 17 जुलै 2023 रोजी तालुका वैद्यकीय अधिकारी यांच्या कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. आमच्या मागण्या पूर्ण करा;नाहीतर खुर्च्या खाली करा,हम अपना हक मांगते; नही किसीसे भिख मांगते,वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील रिक्त पदे भरलीच पाहिजे,भगवान बिरसा मुंडा की जय! अशा जोरदार घोषणा बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी आरोग्य विभाग कार्यालयासमोर दिली.त्यानंतर तालुका वैद्यकीय अधिकारी यांनी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांना चर्चेला बोलावले.25 ते 30 मिनिटे चर्चा करण्यात आली.आम्ही वडगाव येथे आरोग्य सेविकेची नेमणूक केली आहे.त्यामुळे तुम्ही आपले आंदोलन मागे घ्यावे,अशी विनंती तालुका आरोग्य अधिकारी यांनी केली.
                          बिरसा फायटर्स संघटनेच्या निवेदनाची दखल घेत शहादा तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र वळवी यांनी वडगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात श्रीम.दिपाली बैसाणे यांची आरोग्य सेविका या पदावर नियुक्ती केली आहे.आरोग्य सेविका यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र वडगाव येथे तात्काळ हजर राहून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सदर आदेश मिळताच आमचे आंदोलन यशस्वी झाले आहे,आम्ही आता समाधानी आहोत.आरोग्य विभाग प्रशासनाचे आम्ही आभारी आहोत. अशी प्रतिक्रिया बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी दिली.
          या ठिय्या आंदोलनात फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,नंदुरबार जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,वडगाव गाव अध्यक्ष राजू पावरा,वडगाव संपर्क प्रमुख बिरबल पावरा,सल्लागार पवन पावरा, विष्णू पावरा,गणेश पावरा,संतोष पावरा,मुकेश पावरा,करण पावरा,पुखराज पावरा,मंगेश पावरा,राहुल पावरा,रोशन पावरा,अर्जुन पावरा,योगेश पावरा,अमित पावरा,संदिप पावरा,प्रल्हाद पावरा,अर्जुन ठाकरे,दिनेश नावडे,विजय सोनवणे आदि वडगाव शाखेतील कार्यकर्ते उपस्थित होते.
                 ठिय्या आंदोलनाच्या वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी कार्यालयासमोर व आजूबाजूला प्लास्टिक पिशव्या,कुरकुरेच्या पाॅकीटे,बिस्कीट पाकिटे,तंबाखूजन्य पुड्या,गुटखाच्या पुड्या,कचरा इत्यादी अस्वच्छता पाहून बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांनी तो सगळा कचरा एका गोनित भरून परिसर स्वच्छ करत प्रशासनास व लोकांना स्वच्छतेचा संदेश दिला.आरोग्य केंद्रातील सफाई कामगारांनी नेहमी आरोग्य केंद्र व परिसर स्वच्छ ठेवावा.याबाबत वैद्यकीय अधिकारी यांच्याकडे मागणी केली.तालुका आरोग्य केंद्र स्वच्छ राहिले तरच खेड्यातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्र स्वच्छता पाडतील. म्हणून यापुढे आरोग्य विभागाने स्वच्छतेवर लक्ष द्यावे,असे अधिका-यांना खडे बोल सुनावण्यात आले.बिरसा फायटर्सचे नुसते ठिय्या आंदोलनच केले असे नाही तर आरोग्य विभागातील परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा सुद्धा चांगला संदेश दिला,म्हणून संघटनेच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

0 Comments