Advertisement

बालक टू पालक पिक विमा-कृषि विभाग शहादा येथील अनोखा उपक्रम

शहादा तालुक्यातील जयनगर,वडाळी, कोंढावळ,बामखेडा,फेस,खापरखेडा,तोरखेडा,हिंगणी,काकर्दा,खैरवे येथील जि. प. व कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांसाठी पिक विमा फक्त 1/- रुपयात भरणेबाबतचे लेखी पत्र कृषि विभागामार्फत देण्यात आले. महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागातर्फे  तालुका कृषि अधिकारी शहादा मा श्री के एस  वसावे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली "बालक टू पालक पिक विमा" अनोखा उपक्रम राबविण्यात आला.यात जवळपास 15 शाळांना भेटी देऊन जवळपास 5000 लेखी पत्र विद्यार्थ्यांमार्फत त्यांच्या पालकांना पोहोच करण्यात आले. यावेळी कृषि पर्यवेक्षक श्री.विजय माळी, कृषि सहाय्यक श्री.कृष्णा निकुंभ, कृषि सहाय्यक श्री.संतोष वळवी, कृषि सहाय्यक सुकन्या निकुम व संबंधित प्राचार्य व शिक्षक वृंद  उपस्थित होते . विद्यार्थ्यांना पिक विम्याचे महत्व पटवून देण्यात आले .तसेच विद्यार्थ्यांना एक लेखी पत्र देण्यात  आले व ते पत्र त्यांच्या पालकांसाठी होते.त्यात सर्व शेतकरी पालकांनी पिक विमा फक्त 1 रुपयात असल्याने विमा 31 जूलैच्या आत काढण्याचे  आग्रह करण्यात आलेले होते. विद्यार्थ्यांनी पालकांना पिक विमा करून घेण्यासाठी आग्रह करावा असे कृषी विभागातर्फे आवाहन करण्यात आले _

Post a Comment

0 Comments