Advertisement

राणीपूरच्या मराठी शाळेत तात्काळ 4 शिक्षकांची नेमणूक करा: बिरसा फायटर्सची मागणी

मुख्य कार्यकारी अधिकारी व शिक्षणाधिकारी यांना निवेदन


नंदुरबार:जिल्हा परिषद शाळा राणीपूर तालुका शहादा जिल्हा नंदुरबार या शाळेत तात्काळ शिक्षकांची नेमणूक करा,या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्स जिल्हा शाखा नंदुरबार तर्फे जिल्हा परिषद नंदुरबारचे मुख्य कार्यकारी अधिकारी रघुनाथ गावडे व शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना देण्यात आले.
                निवेदनात म्हटले आहे की,जिल्हा परिषद शाळा राणीपूर तालुका शहादा या शाळेत सन 2022-2023 मध्ये एकूण विद्यार्थी संख्या 333 होती.या वर्षी 2023-2024 मध्ये 330 विद्यार्थी संख्या आहे. विद्यार्थी पटानूसार शाळेत एकूण 11 शिक्षकांची आवश्यकता आहे.शाळेत फक्त 7 शिक्षक कार्यरत आहेत. 1 शिक्षक हे दिनांक 16/04/2019 पासून अनाधिकृत पणे गैरहजर आहेत.त्यामुळे रिक्त पदांचा अतिरिक्त काम कार्यरत शिक्षकांना करावे लागते.विद्यार्थी संख्या विचारात घेऊन व विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाकण्यासाठी जिल्हा परिषद राणीपूर तालुका शहादा येथे तात्काळ शिक्षक नेमण्यात यावेत.हीच नम्र विनंती.अन्यथा बिरसा फायटर्स संघटनेकडून जिल्हा परिषद नंदुरबार समोर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल .असा आंदोलनाचा इशाराही प्रशासनाला देण्यात आला आहे.
        दरम्यान जिल्हा परिषद नंदुरबारचे सीईओ रघुनाथ गावडे यांनी निवेदनावर तात्काळ कार्यवाही करत शिक्षणाधिकारी यांना राणीपूर येथील शाळेत शिक्षक नेमण्याबाबत लेखी निर्देश दिले आहेत. मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी बिरसा फायटर्स पदाधिकाऱ्यांशी 5 मिनिटे चर्चा करत शिक्षक भरतीबाबत सकारात्मकता दाखवल्यामुळे बिरसा फायटर्स पदाधिका-यांनी समाधान व्यक्त केले आहे.
       निवेदन देताना बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा,अक्कलकुवा तालुकाध्यक्ष मानसिंग पाडवी,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा,नवापूर तालुकाध्यक्ष राकेश वळवी,नंदुरबार तालुकाध्यक्ष किसन वळवी,जिल्हा प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा आदि 22 बिरसा फायटर्स पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments