Advertisement

मा.आदिवासी विकास, पालकमंत्री के. सी. पाडवी यांना ग्रामीण रुग्णालय धडगाव NRHM च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागणीसाठी निवेदन दिले

दि.२९ जून २०२३

प्रकाश नाईक, नंदुरबार (प्रतिनिधी )

नंदुरबार :* नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव येथे ग्रामीण रुग्णालय मध्ये महाराष्ट्र राज्यातील आरोग्य विभाग अंतर्गत येणाऱ्या NRHM कंत्राटी मानधन तत्वावर जवळपास ४७००० हजार कर्मचारी कार्यरत आहे आणि नंदुरबार जिल्यातील NRHM अंतर्गत ९०० च्या आसपास कर्मचारी कार्यरत आहे सदर कर्मचारी १० ते १८ वर्षापासून आरोग्य सेवा देत आहेत. कोरोना महामारीच्या काळात सुद्धा या कर्मचाऱ्यांनी आपली जीवाची परवा न करता सेवा दिली आहे. तसेच काही कर्मचारी अतिशय दुर्गम भागातील रुग्णांना कुठलाही प्रकारच्या आजार असो अशा रुग्णांना सेवा देण्यास दिवस रात्र तप्तर असून प्रामाणिकपणे सेवा देत आहेत. परंतु या कर्मचाऱ्यांनी अंत्यत कमी मानधन देण्यात येत आहे. तसेच कोणत्याही प्रकाराचा भत्ता देण्यात येत नाही. तसेच सध्याच्या महागाईच्या काळात या कर्मचाऱ्यांच्या मुलांचा शिक्षणासाठी खर्च व उपजीविकेचा खर्च भागवतर येत नाही. तसेच कर्मचारी आजारी वगैरे पडल्यावर या कर्मचाऱ्यांची परिस्थिती अत्यंत वयनीय होते.

तरी माननीय महाशयांना विनंती आहे की ज्याप्रमाणे इतर राज्यातील उदा. ओडिसा, राजस्थान, गुजरात, या राज्यातील घेतले त्याचा आधार घेऊन कर्मचाऱ्यांना शासन सेवेत समावेशन करून घेण्यासाठी आपण स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन महाराष्ट्र राज्य विधान सभा व विधान परिषदे मध्ये NRHM. कंत्राटी कर्मचाऱ्यांना न्याय मिळवून द्यावा अशी निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

*कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या खालील प्रमाणे*

१) समायोजन करणे
२) समान काम समान वेतन
३) जॉब सिक्युरिटी 
४) कोटीच्या निर्णयानुसार समायोजन करून घेणे 
५) पीएफ चालू करण्यात येणे 
६) वार्षिक बंद झालेली वाढ परत चालू करणे पाच टक्के ऐवजी १५ टक्के देणे 
७) अपघात विमा 
८) दुर्धर आजार झालेल्या कर्मचाऱ्यांना सरकारी मदत मिळणे 
९) कर्मचाऱ्यांच्या बदल्या 
१०) कर्मचाऱ्यांच्या कामाचे तास निश्चित करणे 
११) वार्षिक मूल्यमापन न करता पुननिरयुक्ती देण्यात येणे 
१२) कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाल्यास मुलगा मुलगी नातेवाईक यांना त्यांच्या पात्रतेनुसार परावर नियुक्ती देणे 
१३) आदिवासी विभागाने कर्मचाऱ्यांना त्या पद्धतीने समायोजन केले त्यानुसार आरोग्य कर्मचाऱ्यांना सुद्धा समायोजन करून घ्यावे अशा मागणी केली आहे.

मा. आदिवासी विकास व पालकमंत्री के. सी. पाडवी यांना ग्रामीण रुग्णालय धडगाव NRHM च्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यासाठी निवेदन दिले आहे. आणि जॉबसाठी कायम करा या विषयावर अधिक भर देऊन आम्ही न्याय मिळवून देऊ असे आश्वासन मा. आदिवासी विकास व पालकमंत्री के. सी. पाडवी यांनी सांगितले.

यावेळी धडगाव ग्रामीण रुग्णालय मधील कर्मचारी निवेदन देत असतांना अनिल वळवी, (L.S. O. ) हारसिंग पावरा, संदीप पावरा,निमेश वसावे (T.B superlsor) मुन्नी पावरा, (NRC ) आधीपरिचारिका चांदनी पटले, (NRC आधीपरिचारिका राजेंद्र शिंदे, (NRC शिपाई ) विद्या निकम, (NRC, आहारातज्ञ ) अंजना वसावे, (N. B. S O) आदिपरिचारिका ) लिला राठोड, शिपाई आणि मा.मंत्री के. सी. पाडवी उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments