Advertisement

NMMS शिष्यवृत्ती परीक्षेत आदिवासी विद्यार्थ्यांचे घवघवीत यश

रोहीदास जाधव जिल्ह्यात 3 रा,तर रिया पवार 6 वी व दिव्या पवार 7वी

दापोली: आर्थिक दुर्बल घटक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती योजना परिक्षेत NMMS 2023 च्या परिक्षेत दापोली तालुक्यातील आदिवासी विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केले आहे.या परिक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून रोहीदास तुकाराम जाधव जिल्ह्यात 3 रा तर रिया राजेश पवार जिल्ह्यात 6 वी व दिव्या राजेश पवार जिल्ह्यात 7 वी आले आहेत. या विद्यार्थ्यांना विजय भिमराव धनवडे सरांनी मार्गदर्शन केले .
        विरसई जनसेवा मंडळ संचलित विरसई विद्यालयातील हे यशस्वी विद्यार्थी आहेत. विद्यार्थांच्या या शिष्यवृत्ती परीक्षेतील यशाबद्दल अध्यक्ष सचिव व कार्यकारिणीतील सदस्य विरसई जनसेवा मंडळ मुंबई व ग्रामीण तसेच अध्यक्ष व सर्व सदस्य शालेय समिती ,पालक शिक्षक संघ, शाळा व्यवस्थापन समिती,मुख्याध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी,विरसई पंचक्रोशीतील सर्व ग्रामस्थ, सर्व विद्यार्थी व पालक यांनी अभिनंदन करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत. आदिवासी कमिटीचे अध्यक्ष शांताराम जाधव, उपाध्यक्ष अशोक पवार, सचिव काळूराम वाघमारे व कांगवई गांवातील आदिवासी बांधवांनी परिक्षेत यशस्वी झालेल्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले आहे.

Post a Comment

0 Comments