Advertisement

नामांकित शाळा वसतिगृहात प्रवेश प्रक्रिया त्वरित सुरु करा? अशी बिरसा फायटर्सची मागणी

दि.१०/जून /२०२३

 नंदुरबार ( प्रतिनिधी)

नंदुरबार : आदिवासी प्रकल्प अंतर्गत आदिवासी विदयार्थ्यांना नामांकित शाळेत इ.१ ली व इतर वर्गासाठी प्रवेश प्रक्रिया त्वरित राबविण्यात यावी यासाठी बिरसा फायटर्सने प्रकल्प अधिकारी तळोदा यांना निवेदन देऊन मागणी केली आहे.निवेदनात म्हटले आहे की,शैक्षणिक वर्ष २०२३-२४ हे १४ जून पासुन सुरु होत आहे.मात्र, एकात्मिक आदिवासी विकास विभागातंर्गत आदिवासी विदयार्थ्यांना शहरातील नामांकित निवासी शाळेत इ.१ ली व इतर वर्गाकरिता राबविण्यात येणारी अर्ज प्रवेश प्रक्रिया अद्यापही सुरु करण्यात आली नाही.शैक्षणिक वर्ष सुरु होण्यास तीन -चार दिवस शिल्लक असतांना अर्ज भरून प्रवेश प्रक्रियाच सुरु न झाल्याने पालक संभ्रमअवस्थेत आहे.आदिवासी विकास विभागात एवढी उदासीनता का?आदिवासी विभाग प्रवेश प्रक्रिया लवकर राबवत नसल्याने पालक -विदयार्थ्यांनाही त्रास सहन करावा लागतो.तसेच,आता तीन-चार दिवसात शाळा,महाविद्यालये सुरु होतील.त्यासाठी वसतिगृह नवीन प्रवेश प्रक्रियाही तात्काळ सुरु करून, जुन्या विदयार्थ्यांना १४ जूनलाच प्रवेश देण्यात यावा.गेल्या वर्षीही वसतिगृह प्रवेश प्रक्रिया लवकर राबविण्यात आली नाही.शैक्षणिक वर्षाचे पहिले सत्र संपत येतं;तरी प्रवेश प्रक्रिया पूर्ण होत नाही हे दुर्दैव आहे.आदिवासी विकास विभाग जाणूनबुजून उशिराने प्रवेश प्रक्रिया राबवते का?असा प्रश्न उपस्थित होतो.विदयार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी त्वरित प्रवेश प्रक्रिया राबविण्यात यावी अशी मागणी केली आहे.निवेदनावर बिरसा फायटर्सचे राज्य महासचिव राजेंद्र पाडवी,जिल्हाध्यक्ष भरत पावरा, राणीपुर शाखाध्यक्ष सुरेश वसावे, राजू प्रधान,शिवदास पाडवी यांच्या सह्या आहेत.

Post a Comment

0 Comments