Advertisement

माजी विद्यार्थ्यांनी दिली गुरुजींना अनोखी भेट

      
   पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी                               
मोखाडा - शाळा ही एक विद्यमान ज्ञान देणारी महत्त्वाचे मंदिर मानले जाते या शाळेमध्ये दोन महत्त्वाचे भूमिका निभावणारे आढळून येतात ते म्हणजे शिक्षक आणि विद्यार्थी शिक्षक हे अनेक विद्यार्थी घडवून आणि योग्य मार्गाला लावतात आणि काही क्षणानंतर त्यांची सेवानिवृत्त होत असते आणि तेथील विद्यार्थी घावतात.
 अश्याच प्रकारे एखाद्या सेवानिवृत्त गुरुजींची जीवनभराची कमाई म्हणजे त्यांचे विद्यार्थी . जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थी आपल्या हाताखाली शिकून सरकारी नोकरीत लागणे किंवा चांगल्या हुद्यावर काम करणं म्हणजे गुरुजींच्या नोकरीच सार्थक झाल्यासारखे वाटते . मोखाडा तालुक्यातील वाशिद गाव शिक्षणासाठी तालुक्यात प्रसिद्ध आहे . गावात १९८५ सालि शाळेवर रुजू झालेले नामदेव भागा सारक्ते गुरुजी ३१ मे रोजी सेवानिवृत्त झाले त्यांच्या हाताखाली शिकलेले 8 प्राथमिक व माध्यमिक शिक्षक ६ महाराष्ट्र पोलीस २ खाजगी संस्था मध्ये उच्च पदावर कार्यरत आणि इत्तर ६ ते ७ खाजगी नोकरीत कार्यरत आसलेले विद्यार्थी. आपल्या १४ वर्षाच्या गावातील प्राथमिक शिक्षक म्हणून केलेल्या सेवा कालावधीत घडवलेल्या या विद्यार्थ्यांनी गुरुजींचा सेवापूर्तीचा कार्यक्रम एका आनोख्या पद्धतीने साजरा केला गुरुजींची वाजत गाजत गावातून मिरवणूक काढून , गुरुजी आणि त्यांच्या पत्नींना कपडे देवून माजी विद्यार्थ्यांकडून आठवण म्हणून एक स्मृती चिन्ह देवून गुरुजींचा सत्कार केला एवढेच नाही तर संपूर्ण गावाला गाव जेवण गुरुजींच्या माजी विद्यार्थ्यांकडून देण्यात आले . या अनोख्या पद्धतीच्या सतकाराने गुरुजीही भारावून गेले . त्याच बरोबर याच कालावधीत अंगणवाडी मदतनीस म्हणून कार्यरत आसलेल्या व आत्ता सेवानिवृत्ती झालेल्या देवकाबाई ठोमरे आणि सोनिबाई शिंदे यांचाही सत्कार माजी विद्यार्थ्यांनी केला . या सत्कार समारंभाच्या कार्यक्रम प्रसंगी गावचे पोलीस पाटील कृष्णा पाटील , उप सरपंच हनुमंत सप्रे, कार्यक्रमाचे अध्यक्ष राम मोकाशी, सर टीडीसीसी बँकेत तपासनी अधिकारी म्हणून कार्यरत असलेले गावचे सुपुत्र भगवान फसाळे , कृष्णा हमरे, कोंडू गोलवड मेजर, अशोक गोलवड मेजर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , माजी विद्यार्थ्यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देताना विद्यार्थी आणि गुरुजींचे डोळे भरून आले होते , कार्यक्रमाचे उत्कृष्ठ नियोजन माजी विद्यार्थी प्रभाकर शिद सर , दिनकर फसाळे सर , अशोक गोलवड सर , देविदास जाधव सर, दुर्गादास शिद सर राजू गोलवड, लक्ष्मण शिद्, हनुमंत पेहरे, गंगाराम फसाळे, सदाशिव फसाळे, भगवान गोलवड सर , ईश्वर गोलवड, उमाकांत गोलवड व सर्व माजी विद्यार्थ्यांनी केले होते .

Post a Comment

0 Comments