Advertisement

बिरसा फायटर्सच्या दणक्याने शहादा बसस्थानकावर कचरा पेट्या

*बसस्थानक स्वच्छ ठेवण्याचा बिरसा फायटर्सचा संदेश* 

शहादा: शहादा बसस्थानक मध्ये सगळीकडे घाण व अस्वच्छता दिसून आली.बसस्थानकावर एकही कचरा पेटी ठेवण्यात आलेली नव्हती. त्यामुळे कचरा टाकण्यास आसपास कोणतेच साधन नसल्यामुळे प्रवाशी लोक केळी,आंबे इत्यादी फळे व खाऊ, कुरकुरे खाऊन तेथेच पिशव्या टाकत होते.पाणी पिऊन खाली पाणी बाटल तिथेच टाकत होते.तंबाखू ,गुटाखा व पान खाऊन तेथेच थुंकून बसस्थानकाची रंगरंगोटी केलेली दिसून येत होती.बसस्थानकावर जिकडेतिकडे प्लास्टिकच्या पिशव्या, पाणी बाटल,गुटाखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्या,केळीची व आंब्यांची साली पडलेल्या होत्या. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला होता.प्रवाशांना बसस्थानकाच्या घाणीत वाकडे तोंड करून व तोंडावर रूमाल ठेवून बसावे लागत होते व काहींना स्थानकावर बसण्यास लाज वाटत होती.शहादा बसस्थानक हे जणू घाणीचे साम्राज्यच बनले होते.तरीही बसस्थानक प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात होते.
         बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना बस प्रवासा दरम्यान शहादा बसस्थानकावरील ही अस्वच्छता दिसून आली.पावरा यांनी लगेच आगार प्रमुख भोई यांची भेट घेतली व बसस्थानकावरील अस्वच्छता निदर्शनास आणून दिली.शहादा बसस्थानक प्रशासनाने बसस्थानक स्वच्छ नाही केले तर आम्ही शहादा बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते येऊन बसस्थानक साफ करू ! असा इशारा सुशिलकुमार पावरा यांनी बसस्थानक प्रशासनास दिला आहे.
                 त्यानंतर बसस्थानक प्रशासनाने नगर परिषद शहादा तर्फे बसस्थानकावर कचरा पेट्या ठेवल्या आहेत.त्या कचरा पेटीत कचरा टाकून व कचरा पेटीचा वापर करून बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी प्रवाशांना स्वच्छतेचा संदेश दिला आहे.कचरा पेटी उपलब्ध झाल्यामुळे आता प्रवाशी कचरा टाकण्यासाठी कचरापेटीचा वापर करीत आहेत. यामुळे बसस्थानक स्वच्छ राहण्यास मदत होत आहे.

Post a Comment

0 Comments