Advertisement

आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदासमोर शिवमंदिर बांधण्यास विरोध

बिरसा फायटर्स आक्रमक;मंदिर तोडण्याचा इशारा

तळोदा: आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदा समोर शिवमंदिर बांधण्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून तीव्र विरोध दर्शविण्यात आला आहे.आदिवासी सांस्कृतिक भवनासमोर शिवमंदिर बांधण्यास येवू नये,म्हणून बिरसा फायटर्स तळोदा तर्फे मुख्याधिकारी नगरपरिषद तळोदा व प्रकल्प अधिकारी तळोदा यांना निवेदन देण्यात आले होते.तरी नगरपरिषद प्रशासनाने मंदिराचे काम अर्धवट केले आहे,हे पाहून बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहे.
                 बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 29 जून 2023 शुक्रवार रोजी या विषयावर संघटनेची झूम मिटींग घेण्यात आली.आदिवासी सांस्कृतिक भवन हे आदिवासी लोकांच्या विविध सांस्कृतिक कार्यक्रमाच्या सोयीसाठी बांधण्यास आले आहे.त्या भवनासमोर शिवमंदिर बांधून आदिवासी बांधवांवर हिंदू धर्मातील देवी देवतांचे संस्कार जबरदस्तीने बिंबवण्याचा व लादण्याचा काही समाजकंटकांचे ही कुटनिती आहे,षडयंत्र आहे.सांस्कृतिक भवनासमोर शिवमंदिर बांधण्यास येत आहे ही आमच्या आदिवासी अस्तित्वाला धोकादायक बाब आहे.आदिवासी हा कुठल्याही धर्माचा नाही. आदिवासींची ओळख ही स्वतंत्र आहे. सांस्कृतिक भवनासमोर बांधायचेच असल्यास सार्वजनिक वाचनालय बांधा.किंवा आदिवासी कुलदैवत देवमोगरा माता यांचे मंदिर बांधा.आदिवासींच्या अस्तित्वाशी व विकासाशी संबंधित कामच भवनासमोर करा.भवनासमोर शिवमंदिर होऊ द्यायचे नाही.बांधकाम सुरू केल्यास बिरसा फायटर्स तर्फे तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत राहा.प्रशासन ऐकत नसेल तर आपण मंदिरचे बांधकाम तोडून टाकू.या भाषेत सुशिलकुमार पावरा यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना प्रशासनाला कडक इशाराच दिला आहे.
         आदिवासी सांस्कृतिक भवन तळोदासमोर शिवमंदिर बांधणे हे आमच्या आदिवासी अस्तित्वाला घातक काम आहे.हे बांधकाम त्वरित थांबण्यात आले पाहिजे.नाहीतर बिरसा फायटर्स तर्फे तीव्र आंदोलन छेडण्याची तयारी कार्यकर्त्यांनी ठेवा.भवनासमोर बांधायचेच असल्यास वाचनालय बांधा.वाचनालय बांधण्यास सर्व समाजाची सहमती आहे.असे मार्गदर्शन बिरसा फायटर्सचे महासचिव राजेंद्र पावरा यांनी केले.
                    या सभेला बिरसा फायटर्सचे राज्याध्यक्ष मनोज पावरा,महासचिव राजेंद्र पावरा,नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा ,धडगांव तालुकाध्यक्ष अजय वळवी,तळोदा तालुकाध्यक्ष सुभाष पावरा ,नाशिक विभागीय कार्याध्यक्ष हिरालाल पावरा,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा,साता-याचे दिलीप वळवी,नंदुरबार प्रसिद्धीप्रमुख जालिंदर पावरा,प्रताप पावरा,बिरबल पावरा,गुलाबसिंग पराडके,देविदास पावरा आदि बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments