*दि.२५/०६/२०२३*
*प्रकाश नाईक (नंदुरबार : प्रतिनिधी )*
अक्कलकुवा : अक्कलकुवा तालुक्यातील काठी राऊतपाडा काल दिनांक २४/०६/२०२३ रोजी काठी राऊतपाडाचे व परिसरातील ५०ते ६० मजुर गवंडी मिस्त्री काम करणारे तरुण स्थानिक कोणत्याही प्रकारचे रोजगार नसल्याने बेरोजगार तरुण गुजरात राज्यात स्थलांतरित होऊन ज्या ठिकाणी काम मिळाले त्या ठिकाणी काम करतात आणि ते उपजीविका करीत असतात अशा प्रसंगी काठी गावातील व परिसरातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात संबंधित इसम,अतिक शेख हे भरुच येथे आर्थिक पिळवणूक करीत होते.
दरम्यान गावातील नागरिकांनी होणाऱ्या अन्याय विरुद्ध काठी गावाचे शिवसेना पदाधिकारी शिवसेनेचे युवासेना तालुका प्रमुख जयवंत पाडवी यांना ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर जयवंत पाडवी यांनी संबंधित इसमाला अक्कलकुवा येथे गावकऱ्यांच्या मदतीने पकडून ठेवले आहेत आणि पोलीस संरक्षण मागितले आहेत.
त्यात त्यांनी ५ लाख दहा हजार रुपये एवढ्या पैसाची फसवणूक केल्याचे पिढीत तरुण सांगत आहेत.त्यावरून अक्कलकुवा स्थानिक पोलीस स्टेशन मध्ये त्याचा विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0 Comments