दि. १७ जून २०२३
नंदुरबार (प्रतिनिधी )
नंदुरबार : धडगाव तालुक्यातील काकडदा येथे दि.१६ जून २०२३ रोजी माैजे काकडदा ता. धडगाव येथे महाबीज शहादा, कृषी विभाग स्मार्ट प्रकल्प आणि उमेद संस्थेमार्फत वरई वाण फुले एकादशीचे पैदासकार बियाणांचे वाटप करण्यात आले होते.
शहादा महाबीजद्वारे बियाणे बीजोत्पादन कार्यक्राअंतर्गत सीड प्लॉट बियाणे पुरवठा केले तर आर्थिक व तांत्रिक मार्गदर्शन आणि सहकार्य कृषि विभाग स्मार्ट अंतर्गत करण्यात येत आहेत. त्यासाठी उमेद संस्थेमार्फत भगर उत्पादक महिला शेतकरी गटातील महिलांना प्रोत्साहन देत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी कृषि विभाग स्मार्ट अंतर्गत, उमाकांत पाटील यांनी मार्गदर्शन केले. तर बिजोत्पादन कार्यक्रम विषयी पेरणी पासून काढणीपर्यंत व खरेदी धोरण बाबत महाबीजचे कृषि क्षेत्र अधिकारी, अनिता ठाकरे यांनी सविस्तर माहिती स्थानिक बोली भाषेतून सांगितली.
सदर कार्यक्रमचे नियोजन उमेद संस्थेचे तालुका आणि जिल्हा समन्वयक कविता एडके व त्यांचे सहकारी यांनी केले.
यावेळी विविध संस्थेचे प्रतिनिधी, किशोर पाटील, महेंद्र बाविस्कर, सरपंच,प्रितम पाडवी, पानसिंग राहसे इ. सहीत मोठ्या संख्येने महिला आणि ग्रामस्थ आदी उपस्थित होते.
0 Comments