Advertisement

कोपरगावच्या पोलिसांनी मिटविला जोडप्यातील वाद.

कोपरगाव तालुक्यातील सौ विजया व सोमनाथ ह्या पती पत्नीतील चार वर्षां पासुनचा वाद कोपरगाव तालुक्याचे पोलिस निरिक्षक वासुदेवजी देसले साहेब यांनी मिटविला आहे. त्यांनी या दाम्पत्याला सर्व समजूत घालून तब्बल दोन तास त्यांचे समुपदेशन केले आणि शेवटी दोघेही पुन्हा आपसातील मतभेद विसरून पुन्हा एकत्र राहण्यास स्वखुशीने तयार झाले..
कोपरगाव तालुक्याचे पोलिस निरिक्षक वासुदेवजी देसले साहेब यांनी दोघांचाही पुष्पगुच्छ देवून सत्कार केला व आनंदाने त्याना त्यांचे कोळगाव थडी या गावी रवाना केले...
तब्बल चार वर्षा पासूनचे मतभेद आणि एकमेकापासून दूर राहणाऱ्या या जोडप्याला दोन तासांच्या अखंड समुपदेशानानंतर एकत्र आणुन पुन्हा खेळीमेळीने संसार करण्यास प्रवृत्त करण्याचे महान व समाज उपयोगी कार्य आज कोपरगाव तालुक्याच्या पोलिसांनी केले आहे. त्यामुळे कोपरगाव तालुका पोलीसांचे सर्वत्र कौतुक होत आहे..

त्या बद्दल कोपरगाव तालुक्याच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलताताई कोल्हे साहेब व भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष दत्तात्रयजी काले आणि भारतीय जनता पार्टीचे तालुकाअध्यक्ष साहेबरावजी रोहम यांनीही कोपरगांव तालुक्याचे पोलीस निरीक्षक वासुदेव देसले व त्यांच्या सर्व सहकारी अधिकाऱ्यांचे आभार मानले आहेत.. 
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तसेच भारतीय जनता पार्टी दीव्यांग मोर्चा, कोपरगाव.
व कोपरगाव तालुका अपंग संघटना, कोपरगाव यांच्या वतीने ही मनःपूर्वक आभार....

Post a Comment

0 Comments