प्रशासनाचे दुर्लक्ष;स्वच्छता ठेवण्याची बिरसा फायटर्सची मागणी
बिरसा फायटर्स बसस्थानक स्वच्छ करणार!
शहादा: शहादा बसस्थानक मध्ये सगळीकडे घाण व अस्वच्छता आहे.बसस्थानकावर एकही कचरा पेटी ठेवण्यात आलेली नाही. त्यामुळे कचरा टाकण्यास आसपास कोणतेच साधन नसल्यामुळे प्रवाशी लोक केळी,आंबे इत्यादी फळे व खाऊ, कुरकुरे खाऊन तेथेच पिशव्या टाकताना दिसून येतात.पाणी पिऊन खाली पाणी बाटल तिथेच टाकतात.तंबाखू ,गुटाखा व पान खाऊन तेथेच थुंकून बसस्थानकाची रंगरंगोटी केलेली दिसून येते.बसस्थानकावर जिकडेतिकडे प्लास्टिकच्या पिशव्या, पाणी बाटल,गुटाखा, तंबाखूजन्य पदार्थांच्या पुड्या,केळीची व आंब्यांची साली पडलेल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.प्रवाशांना बसस्थानकाच्या घाणीत वाकडे तोंड करून व तोंडावर रूमाल ठेवून बसावे लागत आहे व काहींना स्थानकावर बसण्यास लाज वाटत आहे.शहादा बसस्थानक हे जणू घाणीचे साम्राज्यच बनले आहे.तरीही बसस्थानक प्रशासनाकडून याकडे सर्रास दुर्लक्ष केले जात आहे.
बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना बस प्रवासा दरम्यान शहादा बसस्थानकावरील ही अस्वच्छता दिसून आली.पावरा यांनी लगेच आगार प्रमुख भोई यांची भेट घेतली व बसस्थानकावरील अस्वच्छता निदर्शनास आणून दिली.यावर आगार प्रमुख म्हणाले ,आम्ही कचरा पेटी बनवण्यास टाकल्या आहेत.सफाई कामगारही ठेवला आहे.तरी बसस्थानकावर स्वच्छता ठेवण्यास आपल्या बिरसा फायटर्स सारख्या सामाजिक संघटनांची आम्हाला मदत लागणार आहे.
शहादा बसस्थानक प्रशासनाने बसस्थानक स्वच्छ नाही केले तर आम्ही शहादा बिरसा फायटर्सचे कार्यकर्ते येऊन बसस्थानक साफ करू ! असा इशारा सुशिलकुमार पावरा यांनी बसस्थानक प्रशासनास दिला आहे.
0 Comments