Advertisement

खोडाळा शहरात यंदाही रंगणार बहारदार जगदंबा उत्सव

●यंदाचे हे दुसरे वर्ष बहारदार : बाजार पेठेला आली रौनक ; चलनावढीने व्यापारी सुखावले 

पालघर | सौरभ कामडी 

खोडाळा : मोखाडा तालुक्याला जगदंबा उत्सवाची एक ऐतिहासिक परंपरा आहे. त्या धर्तीवरच खोडाळा येथील जगदंबा ( बोहाडा ) उत्सव तालुक्यात चिरपरिचित होता. बरेच वर्ष खंडीत असलेला खोडाळ्याचा जगदंबा उत्सव हा जुन्या जाणत्याच्या नेतृत्वात एक अनोखी झळाली घेऊन नव्याने साजरा होत आहे. त्यामुळे बाजारपेठेला यात्रेचे स्वरूप आले असुन चलन वलन वाढल्याने रौनक आली असुन एकूणच व्यापारी वर्ग सुखावला असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.खोडाळा येथील जगदंबा उत्सवाचे हे दुसरे वर्ष असून यंदा कुस्त्यांचा जंगी फड पहायला मिळणार आहे.

मोखाडा तालुक्याची शेकडो वर्षांची आदिवासींची परंपरा व संस्कृतीचे प्रतिक असलेला जगदंबा मातेचा उत्सव अर्थात बोहाडा खोडाळा शहरातही दि 4 , 5 , 6 तारखेला साजरा होत असुन जगत जननी आई जगदंबेच्या मिरवणूकी नंतर उत्सवाची सांगता होणार आहे . जगदंबेच्या भव्य मिरवणुकी नंतर कुस्त्यांचा जंगी फड पहायला मिळणार असून या कुस्त्यांमध्ये पहिले बक्षीस 5001 दुसरे 3001 व तिसरे बक्षीस 1501 रुपयांचे असून विजेत्यांना मानाची गदा समर्पित करण्यात येणार असल्याने या कुस्त्या बहारदार होणार असून हाडांच्या पहीलवानांसाठी मोठी पर्वणी ठरणार आहेत.उत्सव राज्याच्या प्रत्येक आदिवासी बहुल भागात साजरा केला जातो, परंतू पूर्वीचा ठाणे व आताचा पालघर हा आदिवासी जिल्हा असल्याने जव्हार, मोखाडा, विक्रमगड या ९९ टक्के आदिवासी समाज असलेल्या तालुक्यात विविध गांवपाड्यात सुध्दा जगदंबेचा उत्सव असलेला बोहाडा आजही मोठ्या प्रमाणात साजरा केला जाऊन आदिवासी कला व संस्कृतीची शेकडो वर्षाची परंपरा ही सर्व धार्मियाकडून बंधू भावाने जपली जाते.हेच या उत्सवाचे फलित आहे.

उत्सव समितीचे अध्यक्ष उमेश येलमामे, उपाध्यक्ष प्रकाश दोंदे, दिनकर पाटील,यांचेसह कार्याध्यक्ष सर्वश्री नारायण कोडीलकर, नामदेव पाटील सचिव उमाकांत हमरे, अन्वर खान, बाळासाहेब मुळे, खजिनदार चंद्रकांत बारगजे, दत्तात्रय झिंजूर्डे तर सल्लागार म्हणून कृष्णा पाटील , अक्षय कोर्डे व पोलिस पाटील श्रीमती भारती पालवे आदींनी उत्सवाचे उत्सवाचे नियोजन उत्तम केले असुन जगदंबा उत्सव शांततेच्या वातावरणात संपन्न करण्यावर भर दिलेला आहे.

 रात्रीच्या वेळेस या उत्सवास प्रारंभ होतो, विविध देवदेवतांचे मुखवटे व वेष परीधान करून आदिवासींच्या पारंपारीक संबळ वाद्याच्या तालावर एका विशिष्ट पध्दतीनेच ही सोंगे नाचविली जातात. भक्तांच्या हातातील टेंभ्याच्या उजेडात ही विविध सोंगे पहाटेपर्यत नाचविली जातात, देव-दानवांचे युध्द व हनुमानाच्या शेपटीला अग्नी लावून नाचविलेले सोंग हे बोहाड्याची रंगत असते.तर दशानन रावण हे जगदंबा उत्सवाचे प्रमुख आकर्षण असते.

 जगदंबा उत्सवाच्या पहिल्या दिवशी श्री गजाननाचे विधिवत पूजन व मिरवणूक अर्थात थाप रात्री ९ ते १२ वाजेपर्यत, दुसऱ्या दिवशी लहान बोहाडा, तिसऱ्या दिवशी 6 मे ला मोठा बोहाडा रात्रभर तर दि. 7 मे रोजी देवीची महापूजा सकाळी ९ वा. होऊन त्यानंतर शहरातून महिषासुर व देवीचे युध्द आणि मिरवणूक होऊन उत्सवाची सांगता होते.अशी परंपरा आहे.मात्र यावर्षी कुस्त्यांचा जंगी फड हे प्रमुख आकर्षण असून त्यासाठी खोडाळा येथील प्रथितयश डॉ.मिठाराम कडव व पंचक्रोशीत बांधकाम साहित्यासाठी प्रसिद्ध असलेले विजयशेठ येलमामे व डॉ.मिलींद कडव,अनिल येलमामे आणि अक्षय येलमामे यांनी अनमोल सहकार्य केलेले आहे.

Post a Comment

0 Comments