Advertisement

पावारपाडा येथील शेतकरी कुटूंबातील मुलींचा पोलिस भरतीत घवघवीत यश

*पालघर प्रतिनिधी :सौरभ कामडी *
जव्हारः तालुक्यातील कौलाळे पैकी पवारपाडा येथील यशोदा झोले व प्रियंका झोले या मुलींची मुंबई पोलिस मधे निवड झाल्याबद्दल बहुजन विकास आघाडीचे तालुका अध्यक्ष एकनाथ दरोडा यांनी मुलींच्या घरी भेट देऊन त्यांचा विशेष सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्या दिल्या.
राज्याच्या गृहविभागात नुकतीत १८००० पदांची पोलिस भरती प्रक्रिया पार पाडली. यासाठी महाराष्ट्रातुन १८ लाख उमेदवारींनी अर्ज केले होते. त्यापैकी एकट्या मुंबई शहर विभागात ४ लाखांपेक्षा अधिक उमेदवारांनी पोलिस बनन्यासाठी अर्ज केले होते. सदरचा निकाल हा १७ मे रोजी संध्याकाळी उशीरा लागला. यात जव्हार तालुक्यातील शंकर रामा झोले यांच्या प्रियंका शंकर झोले ११२ गुण व यशोदा शंकर झोले ११६ गुण या दोन्ही मुलींनी उत्तम गुण मिळवत ओपण मधुन घवघवीत यश संपादन केले व आपल्या सोबतच आईवडीलांचे नाव देखील वाढवले. गेली काही वर्षांपासुन या दोघीही सोबत मैदानी चाचणीचा सराव करीत होत्या. लेखीसाठी त्यांनी भोपोली येथील निलेश सांबरे यांच्या वाचनायलयात तयारी केली होती. 
दरम्यान ही कौतुकास्पद वार्ता कानावर पडताच बहुजन विकास आघाडी पक्षाचे तालुका अध्यक्ष व झाप ग्रामपंचायतीचे होतकरू सरपंच एकनाथ दरोडा तसेच कौलाळे ग्रामपंचायतचे सदस्य प्रदिप निकुळे सोबत ईश्वर बांगाड यांनी झोले कुटूंबीयांच्या घरी भेट घेऊन त्यांच्या समवेत आईवडीलांना गुलाबाचे फुल, शॉल व प्रत्येकी एक एक श्रीफल देऊन सत्कार केला आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. तसेच "शेतकऱ्याच्या मुलींनी अशी उल्लेखनिय कामगिरी केल्या बद्दल त्यांच्या सोबत तालुक्यातील अभ्यास करणाऱ्या मुलामुलींचे मनोबल वाढवण्यासाठी ही लवकरच आपण तालुका स्थारावर सत्कार सोहळा ठेवूयात असेही दरोडा यांनी सांगितले. तसेच पोलिस भरतीमधे यश मिळवायचे असेल तर त्यासाठी मैदानी चाचणी सोबतच लेखी परिक्षा देखील खुपच महत्वाची आहे यास्तव त्यांनी तालुक्यातील शाळांवर टिका करत आश्रम शाळे सोबतच जिल्हा परीषेदेच्या शांळाचा शैक्षणिक दर्जा जास्त प्रमाणात खालावलेला आहे. पालक मुलांना का मारले? येथे जेवन चांगलं भेटत नाही? अशा तक्रारी नेहमी करत असतात परंतु शैक्षणिक दर्जाची चौकशी कोणीच करत नाही. मात्र त्याला अपवाद आमच्या झाप ग्राम पंचायत मधली धोडपाडा जिल्हा परीषद शाळा आहे तेथे मी स्वतः वर्गात बसुन शिक्षकांसोबतच विद्यार्थ्यांशी देखील संवाद साधतो आणि शैक्षणिक समस्या जानुन घेतो" असे देखील दरोडा यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले.
तसेच आमच्या दोघिंच्या यशात आईवडीलांचे सर्वात जास्त योगदान आहे असे यशोदा झोले हीने सांगितले. तसेच आपल्या भागातील दहावीच्या मुलांना लिहता वाचता येत नाही तरी तुम्ही लोकप्रतिनिधी म्हणुन पाण्याची समस्या सोडवता तसेच शिक्षणाकडे देखील जास्तीत जास्त गांभिर्याने लक्ष द्या असे देखील तिने एकनाथ दरोडा यांना विनंती केली. म्हणजे आपल्या तालुक्याती बहुसंख्या विद्यार्थी स्पर्धा परिक्षा उतिर्ण होतील असे म्हटले. यास्तव कौलाळे ग्रामपंचायत मधुनच नव्हेत तर अख्या जव्हार तालुक्यातुन दोघींवर ही शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

Post a Comment

0 Comments