नंदुरबार,धडगाव : प्रतिनिधी दि. 24 मे 2023
धडगाव : नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव तालुक्यातील झापी या गावात पाणी टंचाई निर्माण झाली आहे त्यामुळे झापी येथील खेड्या पाड्यातील नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहेत. पिण्याचे पाणी, कपडे धुण्याचे,इतर कामासाठी पाणी घेऊन येण्यासाठी गाढवांची मदत घ्यावी लागत आहे. या फोटो मध्ये आपल्याला एक लहान मुलगी पाणी घेऊन येतांना दिसत आहे. त्याबरोबरच गाढवाच्या खांद्यावर पाण्याचे दोन ड्रोम ठेवलेली आहे.ते आपल्यांना दिसत आहे. अशा प्रकारे पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्राण्यांची सुद्धा मदत घ्यावी लागते. आता उन्हाचा तडाखा वाढल्यामुळे पाण्याची पातळी खाली गेलेली आहे त्यामुळे पाणी टंचाईच्या सामना करावा लागत आहे.
नागरिकांना आणि हातपंप मधील पाणी सुद्धा खाली गेलेले आहे,त्यामुळे पाण्यासाठी खूप मोठी कसरत पायपीट करावी लागत आहेत.याकडे प्रशासनाने दुर्लक्ष न करता या गावात पाण्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी अशी मागणी गावकरी करत आहे.
0 Comments