Advertisement

तहसिल कार्यालय अक्कलकुवा येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्री शक्ती समाधान शिरीराचे आयोजन


 नंदुरबार प्रतिनिधी २० मे 

नंदुरबार : जिल्ह्यातील अक्कलकुवा तहसील कार्यालय येथे एकात्मिक बाल विकास सेवा योजना प्रकल्प अक्कलकुवा यांच्या संयुक्त विद्यमाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर की शक्ती समाधान या शिबिराचे आयोजन दि.25/05 2023 रोजी सकाळी 11. वाजता स्थळ. तहसील कार्यालय अक्कलकुवा येथे आयोजित करण्यात आले आहेत.
समस्याग्रस्त आणि पीडित महिलांना त्यांच्याप्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. महिलांच्या अडचणीची सोडवणूक आणि समाजातील पीडित महिलांना तुलम मार्गदर्शनाची सुविधा मिळावी याच्यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी स्त्री शक्ती समाधान या शिबिराचे आयोजन ठेवण्यात आले. या दरम्यान सदरील शिबिरात तालुका वैद्यकीय अधिकारी, पोलीस स्टेशन, गटशिक्षणाधिकारी, तालुका कृषी अधिकारी, भुमी अभिलेख औद्योगिक प्रशिक्षण संस्था, एस. टी. महामंडळ, पशुसंवर्धन, समजकल्याण, उमेद, महावितरण महिला आणि बाल विकास विभाग, पुरवठा विभाग व तालुक्यातील इतर विभागाचे अधिकारीव कर्मचारी यांनी या शिबिरात उपस्थित राहून विविध योजनांची माहिती देणार आहे. जिल्हा स्तरावरून वनस्टॉप सेंटर चाईल लाईन बाल संरक्षण कक्ष या विभागाचे अधिकारी प्रामुख्याने या शिबिरात मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी या शिबिराचे लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments