Advertisement

संविधान की बात-विकास के साथ



या संविधान जागराच्या उपक्रमाचा :100 वी समारोपीय-संविधानाची शाळा: 6 मे 2023 ला सायंकाळी 5.30 वाजता : स्थळ- डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे 

संविधान फौंडेशन नागपूर या सामाजिक संस्थेची स्थापना 2012 मध्ये झाली. संविधानिक मूल्य-विचार लोकांपर्यंत घेऊन जाणेसाठी मागील एका दशकात संविधान फौंडेशन ने विविध उपक्रम ,जसे, संविधान परिषद, संविधान कार्यशाळा, संविधान साहित्य संमेलन, संविधान व्याख्यान मला, संविधानाची शाळा, संविधान महोत्सव, संविधान दूत/मित्र राबविले आहेत. राज्य सरकारला याबाबत पुन्हा दि 7 जानेवारी 2020 ला सविस्तर प्रस्ताव पाठवला. संविधान हा विषय सर्व स्तरावरील अभ्यासक्रमाचा अनिवार्य भाग व्हावा ही मागणी केली आहे. याशिवाय सरकारकडे विकासाच्या विषयावर, बजेट तरतूद व खर्च, तसेच योजना अंमलबजावणी, अट्रोसिटी ऍक्ट, आरक्षण कायदा, इत्यादीबाबत सरकारकडे आग्रही भूमिका मांडत आहे. वर्ष 2023 ते25 हे संविधान का अमृत महोत्सव म्हणून राज्य व केंद्र सरकारने अभियान रुपात सुरू करावे अशी विनंती प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना , ऑक्टोबर 2022 पत्राने केली आहे. विविध 14 मुद्धे/कार्यक्रम सुचविले आहेत. म्हणूनच , "संविधान की बात-विकास के साथ" ही संविधानाची शाळा चे घोष वाक्य आहे. 

माहितीसाठी सांगितले पाहिजे की 2005 मध्ये इ झेड खोब्रागडे या IAS अधिकाऱ्याने ,नागपूर ZP चे सीईओ असताना , नागपूर जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये संविधान प्रास्ताविका रोज वाचण्याचा उपक्रम स्वतःचे अधिकारात सुरू केला. दर्शनी भागात शाळेच्या भिंतीवर प्रास्ताविका लिहण्याचे व रोज म्हणायचे आदेश त्यांनी दिले होते. त्यांचेच संकल्पनेतून व पुढाकाराने वर्ष 2005 मध्ये नागपूर ला 26 नोव्हेंबर ला संविधान दिवस साजरा करण्यात आला. देशात हे पहिल्यांदा घडले.

 इ झेड खोब्रागडे यांनी सेवेत कार्यरत असताना, व 2012 च्या सेवानिवृत्ती नंतर राज्य व केंद्र सरकार कडे पाठपुरावा केला. राज्य सरकारने2008 पासून महाराष्ट्रभर तर केंद्र सरकारने 2015 पासून देशभर संविधान दिवस 26 नोव्हेंबर ला साजरा करण्याचे आदेश काढलेत. त्यामुळे शाळा, कॉलेजेस, विद्यापीठे, ऑफिसेस मध्ये संविधान प्रास्ताविका वाचली जाते. कधी नव्हे ती, संविधानाच्या विविध पैलूंवर, वैशिष्ठे वर चर्चा सुरू झाली. इ झेड खोब्रागडे यांनी वर्ष 2005 मध्ये नागपूर जिल्ह्यात "संविधान ओळख" या नावाने सुरू केलेला संविधान जनजागृतीचा उपक्रम आता देशभर साजरा होऊ लागला. पूर्वी असे होत नव्हते. समाजात सुद्धा मोठ्या प्रमाणात संविधान जागृतीचे विविध कार्यक्रम अनेक संस्था व व्यक्ती सातत्याने करीत आहेत. देशाचे संविधान आहे, सर्व भारतीयांचे आहे, कोणताही भेदभाव नाही. देशाला प्रगतीच्या शिखरावर घेऊन जाणारे हे संविधान प्रत्येक भारतीय व्यक्तीला प्रगतीची ,चांगले जीवन जगण्याची, समानतेची संधी देते. खरं तर हा देशाचा राष्ट्रग्रंथ आहे. प्रास्ताविका वाचली की लक्षात येईल. म्हणून संविधान प्रास्ताविक वाचण्याचा हा उपक्रम महत्वाचा आहे. 

  हे उद्धिष्ट लक्षात घेऊन संविधान फौंडेशन ची स्थापना, "संविधान ओळख" हा उपक्रम पुढे घेऊन जाणेसाठी, 2012 मध्ये करण्यात आली. . एक दशक झाले. विविध उपक्रम राबविले. राज्य व केंद्र सरकारकडे प्रस्ताव पाठविले. संविधानाची शाळा हा त्यापैकी एक उपक्रम होय. पहिल्यांदा 2019 मध्ये युवकांसाठी संविधानाची शाळा व संविधान दूत या नावाने कार्यक्रम घेण्यात आला. पुढे 1 मे 2021 पासून दर शनिवारी ऑनलाइन संविधानाची शाळा हा कार्यक्रम राबविला. सुरुवात डॉ यशवंत मनोहर यांच्या भाषणाने झाली. आतापर्यंत 99 कार्यक्रम झालेत . सर्व स्तरावरील मान्यवर व्यक्ती व कार्यकर्ते यांना गेस्ट स्पीकर म्हणून निमंत्रित केले. काहींना सहभागी होता आले नाही. हा कार्यक्रम" संविधान की बात विकास के साथ" या थीम वर झाला. बजेट, योजना अंमल बाबत ही चर्चा झाली.प्रत्येक कार्यक्रम संविधान फौंडेशन च्या पेज वर FB live करून विडिओ youtube वर टाकण्यात आले. आजही पाहता येतील.
   
या उपक्रमाचा समारोप ,दि 6 मे 2023 ला सायंकाळी 5.30 वाजता , स्थळ डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन मालधक्का पुणे येथे संपन्न होत आहे. संविधानाची शाळा-100 व्या कार्यक्रमाचे गेस्ट स्पीकर आहेत माननीय संजय आवटे वरिष्ठ पत्रकार आणि संपादक लोकमत. विषय आहे: लोकशाही वर बोलू या: या कार्यक्रमास आपण मित्र परिवार सह, वेळेचे आत यावे आणि संविधान जागराच्या या उपक्रमाचे साक्षीदार व्हावे अशी विनंती आयोजकांचे वतीने करण्यात येते. या प्रसंगी, इ झेड खोब्रागडे यांनी लिहलेले ,आपले संविधान या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे. 

 आपले माहितीसाठी सांगू इच्छितो की 26 नोव्हेंबर 2022 ला संविधान फौंडेशन व विविध संस्था व व्यक्ती यांचे सहभागाने पुणे येथे प्रथमच, वॉक फार संविधान, चा कार्यक्रम उत्साहात व प्रचंड प्रतिसादात साजरा करण्यात आला होता.अनेक मान्यवर या वॉक मध्ये सहभागी झाले होते. 

विनीत:
संविधान फौंडेशन व वॉक फॉर संविधान मित्र परिवार, पुणे

Post a Comment

0 Comments