Advertisement

आदिवासी उमेदवार कैलास गवळी यांना बिरसा फायटर्सचा पाठिंबा

सुशिलकुमार पावरा विकास आघाडीच्या उमेदवारांचा प्रचार करणार

माध्यमिक शिक्षक पतपेढी निवडणूक 2023

रत्नागिरी: आदिवासी संघटना समूहाचे उमेदवार कैलास गटल्या गवळी सर्वसाधारण गट यांना बिरसा फायटर्स संघटनेचा पाठिंबा देत असल्याबाबतचे पत्र बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी समन्वयक पतपेढी विकास आघाडी रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढी निवडणूक 2023 यांना दिले आहे.
               सध्या रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शाळा सेवक सहकारी पतपेढीची निवडणूक 2023 सुरू आहे.सदर निवडणुकीत आपल्या पतपेढी विकास आघाडी कडून श्री. कैलास गटल्या गवळी उपशिक्षक सागवे, तालुका राजापूर यांना आघाडीच्या वतीने सर्वसाधारण गटातून उमेदवारी घोषित केली आहे.
 याबद्दल आम्ही मनःपूर्वक आनंद व्यक्त करतो व तुमचे आभार मानत आहोत.  
             सदर निवडणुकीमध्ये आवश्यक प्रसिद्धीपत्रके,जाहीरनामा व अन्य कोणते प्रकारचे प्रचार साहित्य यावर पाठिंबा म्हणून बिरसा फायटर्स संघटनेचे नाव घेण्यास किंवा छापण्यास आमची कोणतीही हरकत नाही असे या निवेदनाद्वारे जाणीवपूर्वक कळवित आहोत.आघाडीचे सर्व अधिकृत उमेदवार व आमचे आदिवासी संघटना समूहाचे उमेदवाराचा जाहीर प्रचार करण्यात आमचा सक्रीय सहभाग राहील. कृपया याप्रमाणे आवश्यक ती पुढील कार्यवाही व्हावी ही अपेक्षा आहे.आपल्या पतपेढी विकास आघाडीच्या उत्तम कार्यासाठी आमच्या मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा.या आशयाचे पत्र सुशिलकुमार पावरा यांनी समन्वय विकास आघाडी यांना दिले आहे.
                               रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षक सेवक पतपेढीची पंचवार्षिक निवडणूक 30 एप्रिल रोजी होणार आहे.या निवडणूक शिक्षक परिषद, शिक्षक भारती ,शिक्षकेतर संघटना,कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटना,आदिवासी संघटना समुदाय, मागासवर्गीय शिक्षक,कास्ट्राईब संघटना (पांढरे गट) समूदाय अशी विकास आघाडी करण्यात आली आहे.विकास आघाडीत कैलास गवळी यांना सर्वसाधारण गटातून उमेदवारी देण्यात आली आहे.सुशिलकुमार पावरा स्वतःच आदिवासी उमेदवाराचा प्रचार करणार आहेत.

Post a Comment

0 Comments