Advertisement

विभागीय नको,केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करा: बिरसा फायटर्सची मागणी

मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री यांना निवेदन

दापोली: केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करावी,विभागीय पद्धतीने भरती करू नये,अशी मागणी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शिक्षणमंत्री दिपक केसरकर यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
                निवेदनात म्हटले आहे की,राज्यात सध्या तब्बल 34 हजार जागांवर शिक्षक भरती प्रस्तावित आहे.पुढील शैक्षणिक वर्ष 2023-2024 सुरू होण्यासाठी ही शिक्षकांची रिक्त पदे भरली जाणार आहेत.मात्र याचवेळी शिक्षणमंत्र्यांनी विभागीय शिक्षक भरती ही विचाराधीन असल्याचे स्पष्ट केले आहे.यामुळे शिक्षक भरतीसाठी वाट पाहणा-या राज्यातील उमेदवारांवर अन्याय होणार आहे.म्हणून डी.एड.व बीएड धारक उमेदवारांनी विभागीय शिक्षक भरतीवर आक्षेप घेतला आहे.
           विभागीय शिक्षक भरतीमुळे विभागातील शिक्षकांवर आणि विभागावर अन्याय होणार आहे.त्यामुळे 2017 च्या शासन निर्णयानुसार केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती व्हावी.शिक्षकांच्या सर्वाधिक जागा कोकण विभागात असल्यामुळे विभागीय शिक्षक भरती व्हावी ,म्हणून कोकणात काही संघटनांद्वारे आंदोलने सुरू आहेत. विभागीय शिक्षक भरतीचा निर्णय कायदेशीररित्या आणि नैतिकदृष्ट्या उचित नाही.तसेच विभागीय शिक्षक भरती प्रक्रिया ही अखंड महाराष्ट्राच्या एकतेला बाधक ठरू शकते.
                 विभागीय शिक्षक भरती करून भरतीत साथानिकांनाच प्राधान्य द्यावे,न्याय द्यावा,अशी मागणी करत कोकणात आंदोलने सुरू आहेत. मात्र ही आंदोलने बेकायदा,टेट पात्र असूनही उमेदवारांच्या भरती प्रक्रियेत अडथळा आणणे,हा आंदोलनाचा उद्धेश असू शकतो.त्यामुळे विभागीय पद्धती बाजूला ठेवून संपूर्ण महाराष्ट्रातील पात्र उमेदवारांचा विचार करून केन्द्रीय पद्धतीनेच शिक्षक भरती करण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने शासनाकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments