Advertisement

बाबासाहेब आंबेडकरांना बिरसा फायटर्सतर्फे अभिवादन !

बाबाहेबांचे शैक्षणिक कार्य सर्वांसाठी प्रेरणादायी: सुशिलकुमार पावरा
 दापोली: भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंतीनिमित्त बिरसा फायटर्स या आदिवासी सामाजिक संघटनेतर्फे अभिवादन करण्यात आले.पुज्य साने गुरूजी बाल उद्यान दापोली येथील डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी पुष्पहार अर्पण केला.त्यानंतर पुतळ्यास फुले वाहून पूजन करण्यात आले.यावेळी पिंगला पावरा, सुशिलकुमार पावरा,अरूण वळवी,राजेंद्र पाडवी ,हॅरी पावरा,परी पावरा आदि आदिवासी बांधव उपस्थित होते.उद्यानात गायनाचा कार्यक्रम सुरू होता.
              बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या विचारातून एक आदर्श समाजबांधणीचे काम केले.समाजप्रबोधन, समाजात जागृती,समाज सुधारण्याचे विशेष कार्य बाबासाहेबांनी केले,म्हणून त्यांना समाजसुधारकही म्हणतात.त्यांचे शैक्षणिक कार्य समाजासाठी महत्त्वपूर्ण व प्रेरणादायी आहे.शिका,संघटित व्हा व संघर्ष करा हा संदेश त्यांनी आपल्या अनुयायांना दिला.त्यांनी शिक्षणासाठी घेतलेले परिश्रम, संपादित केलेल्या अत्युच्च शैक्षणिक पदव्या,त्यांनी त्यातून संपादित केलेली असामान्य व कुशाग्र बुद्धीमत्ता ह्या गोष्टी आजही सर्वांसाठी प्रेरणादायी आहेत.
             शिक्षण हे वाघीणीचे दूध आहे आणि जो ते प्राशन करेल तो वाघासारखा गुरगुरल्याशिवाय राहणार नाही,असे त्यांनी शिक्षणाबद्दल लिहिले आहे.कनिष्ठ जातीच्या लोकांमध्ये शिक्षणाबद्दल जागृती निर्माण व्हावी,शिक्षणाचे महत्त्व समजावे,म्हणून मुलांना शाळेत पाठवावे यासाठी आंबेडकरांनी प्रोत्साहन केले.शिक्षणामुळे सामाजिक व आर्थिक स्थिती सुधारते, हे त्यांनी लोकांना पटवून दिले.अशा महान शिक्षणतज्ज्ञ,विद्वान, समाजसुधारक,कायदेपंडित, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब आंबेडकर यांना कोटी कोटी प्रणाम! करत सुशिलकुमार पावरा यांनी बाबासाहेबांना अभिवादन केले.

Post a Comment

0 Comments