बिरसा फायटर्स आक्रमक;राज्यभर निवेदन
सरकारला दिला आंदोलनाचा इशारा
रत्नागिरी: पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी,इभाडपाडा येथील आदिवासी कुटूंबाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषीं अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करा , अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेशकुमार पंधरे,राज्याध्यक्ष मनोज पावरा, उपाध्यक्ष गणेश खर्डे, महासचिव राजेंद्र पाडवी, सचिव संजय दळवी,महानिरीक्षक दादाजी बागुल,कार्यकर्ते राजेश धुर्वे, नाशिक विभागीय अध्यक्ष विलास पावरा, कोकण विभाग अध्यक्ष राजाभाऊ सरनोबत,विदर्भ अध्यक्ष सोयाम,पालघर जिल्हाध्यक्ष मनोज कामडी, ठाणे जिल्हाध्यक्ष सतीश जाधव, नाशिक जिल्हाध्यक्ष उमाकांत कापडणीस, नंदुरबार जिल्हाध्यक्ष भरत पावरा ,धुळे जिल्हाध्यक्ष वसंत पावरा , अक्कलकुवा अध्यक्ष मानसिंग पाडवी, तळोदा अध्यक्ष सुभाष पावरा इत्यादी राज्यातील पदाधिकारी यांनी महाराष्ट्र शासनास ईमेल द्वारे व प्रत्यक्षात निवेदन पाठवले आहे. वाॅटसप ग्रुपवर या घटनेबाबत सरकारचा बिरसा फायटर्स संघटनेकडून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला आहे.
आदिवासी कुटूंबाला अमानुषपणे मारहाण करणाऱ्या जुलुमशाही सरकारचा आम्ही तीव्र शब्दात जाहीर निषेध व्यक्त करतो.
मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेच्या भूसंपादनासाठी पालघर पोलिसांनी आदिवासी बांधवांवर भयंकर अमानुषपणे मारहाण केली आहे.डहाणू तालुक्यातील धानिवरी,इभाडपाडा गावात आठ आदिवासी कुटुंबे पिढ्यानंपिढ्या त्या ठिकाणी राहतात.आदिवासींना मोबदला न देता,पुनर्वसन न करता मुंबई-बडोदा एक्सप्रेसवेसाठी घरात घुसून अमानुषपणे मारहाण करून महिला,वृद्ध व लहान मुलांना घराबाहेर काढले.पोलिसांनी गरीबांच्या संसार रणरणत्या उन्हात रस्त्यावर फेकला.पुरोगामी महाराष्ट्रात एक्सप्रेससाठी आदिवासींना स्वतःचा घरातून अमानुषपणे मारहाण करून बाहेर काढले जाते;हे किती दुर्दैवी घटना आहे.रस्त्यांना न्याय मिळतो.परंतु,या देशातील मूळ मालक आदिवासींना न्याय मिळत नाही ही फार मोठी शोकांतिका आहे.
अमानुषपणे मारहाण करणाऱ्या दोषीं पोलीस अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करावी व डहाणू तालुक्यातील बाधित कुटूंबाला जोपर्यंत पूर्ण मोबदला,पुनर्वसन होत नाही;तोपर्यत सदर कुटूंबांला आहे त्या ठिकाणी राहण्यास द्यावे हि विनंती.अन्यथा,बिरसा फायटर्स व सर्व आदिवासी संघटनांकडून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल,याची नोंद घ्यावी.असा आंदोलनाचा इशाराच बिरसा फायटर्स संघटनेकडून शासनास देण्यात आला आहे.
0 Comments