Advertisement

मोखाडा महावितरण कंपनीचा गलथान कारभार तीन दिवसांपासून ट्रांसफार्मर नादुरुस्त

पालघर प्रतिनिधी-सौरभ कामडी 

पालघर(मोखाडा)- विद्युत वितरण कंपनीच्या गलथान कारभारामुळे सातूर्ली वडपाडा येथे असलेल्या नादुरुस्त रोहित्र वरील ग्राहक नागरिक त्रस्त झाले असून येथे तीन दिवसांपासून ट्रांसफार्मर नादुरुस्त आहे विद्युत वितरण कंपनीने लक्ष घालून नादुरुस्त झालेला ट्रांसफार्मर दुरुस्त करावा व ग्राहक नागरिकांची पिळवणूक थांबवावी अशी मागणी ग्रामस्थ करीत आहेत
  या ट्रांसफार्मर वरून भेंडीपाडा,जांभुळवाडी, वडपाडा,गांधीपूल,पासोडीपाडा,वस्तीवर असलेली घरे अशा अनेक गाव पाड्यांना या एकाच ट्रांसफार्मर वरून सप्लाय दिलेला आहे त्यामुळे होल्टेजचे प्रमाण खूप कमी दाबाचे आहे. फॅन मोटर अशा अनेक इलेक्ट्रिक वस्तू चालत नाहीत त्यामुळे अनेक वेळा विद्युत वितरण कंपनी मोखाडा येथे वारंवार सूचना देऊनही विद्युत वितरण कंपनी मोखाडा दुर्लक्ष करीत आहे
  या ट्रांसफार्मर वरील अतिरिक्त भार कमी करण्यासाठी गेल्या अनेक दिवसापासून ग्राहक महावितरण ला कल्पना देत होते मात्र या गोष्टीची गांभीर्याने दखल महावितरण मोखाडा घेत नाही असा संताप ग्राहक व्यक्त करत आहेत..
  दरम्यान याबाबत अतिरिक्त रोहित्र(ट्रान्सफार्मर) मिळवण्यासाठी स्थानिक जिल्हा परिषद अध्यक्ष (राज्यमंत्री दर्जा) प्रकाश निकम यांचे पत्र दिलेले असतानाही संबंधित विभागाकडून त्या पत्राला केराची टोपली दाखविल्याचा आरोप ग्राहकांनी केला आहे. स्थानिक विभागात तक्रार करूनही महावितरणचे कर्मचारी तक्रारींकडे दुर्लक्ष का करीत आहेत असा सवाल उपस्थित होत आहे.
या घटनेविषयी दिनांक 20 4 2023 रोजी जाधव साहेब व शाखा अभियंता बनसोडे यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता संपर्क होऊ शकला नाही..

Post a Comment

0 Comments