Advertisement

आदिवासी महिला शिक्षिकेला त्रास देणा-या शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना बडतर्फ करा: बिरसा फायटर्स आक्रमक

मुख्य कार्यकारी अधिकारी यांना निवेदन 

आदिवासी शिक्षिकेला त्रास देत 3 वर्षांपासून वरिष्ठ वेतनश्रेणीपासून वंचित ठेवले

सुशिलकुमार पावरा यांनी दिला सीईओ दालनासमोर उपोषणाचा इशारा

शिक्षणाधिकारी यांना डी.एड.व बी. एड. यातील फरक कळत नाही: सुशिलकुमार पावरा

 दापोली: आदिवासी शिक्षिकेला त्रास देणा-या श्री.वामन जगदाळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करण्याची मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी रत्नागिरी जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी किर्ती पूजार यांच्याकडे केली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीचे गटविकास अधिकारी आर एम दिघे व गटशिक्षण अण्णासाहेब बळवंतराव यांना देण्यात आले आहे.शिक्षणाधिका-यांवर कारवाईच्या मागणीसाठी सुशिलकुमार पावरा यांनी आपले 478 वे उपोषण सीईओ दालनासमोरच करणार असल्याचा इशाराही दिला आहे.
                       श्रीम.पिंगला गिरधर रावताळे यांच्या वरिष्ठश्रेणीचा प्रस्ताव जाणीवपूर्वक गायब करून व यादीतून नाव वगळून वेतनापासून वंचित ठेवणा-यांची सखोल चौकशी करून तात्काळ निलंबनाची कारवाई करण्याच्या मागणीसाठी बिरसा फायटर्स संघटनेने प्रशासनास दिनांक 20/12/2022 रोजी निवेदन देऊन आंदोलन केले होते.त्या पत्रावर शिक्षणाधिकारी श्री.वामन जगदाळे यांनी दिनांक 8/2/2023 रोजीच्या पत्रानुसार गटशिक्षण अधिकारी व गटविकास अधिकारी पंचायत समिती दापोली यांना कळविले आहे की,श्रीम.पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षिका यांचा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव आतापर्यंत 3 वेळा प्राप्त झालेला आहे.परंतू त्यांना नोकरी लागल्यापासून 12 वर्षे पूर्ण होत नाहीत,त्यांची पात्रता डी.एड.व बी. एड.अशी आहे.म्हणून त्या पात्र होऊ शकत नाहीत. त्या दिनांक 28/06/2024 रोजी पात्र होणार आहेत.असे वरिष्ठ वेतनश्रेणीबाबत दिशाभूल करणारे पत्र पाठवले आहे.
                       एकंदरीत प्रस्तावाची चौकशी केली असता असे निदर्शनास येत आहे की,श्रीमती पिंगला गिरधर रावताळे आदिवासी शिक्षिका यांचा 3 वेळा वरिष्ठ वेतनश्रेणीचा प्रस्ताव सादर करूनही प्रस्ताव जाणीवपूर्वक गायब करणे,यादीतून नाव वगळून वेतनापासून वंचित ठेवणे, वरिष्ठ वेतनश्रेणीसाठी पात्र असतानाही आदिवासी शिक्षकेला त्रास देणे या कामात श्री.वामन जगदाळे शिक्षणाधिकारी यांचाच हात असल्याचे दिसून येते,तसेच शिक्षणाधिकारी प्राथमिक वामन जगदाळे यांच्या दिनांक 8/2/2023 रोजीच्या पत्रान्वये या प्रकरणात श्री.वामन जगदाळे हेच दोषी असल्याचे सिद्ध होते. 
                          श्रीमती पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षिका यांच्या बॅचमधील बी.एड. व डी.एड.अशी समान पात्रताधारक सर्व शिक्षकांना सन 2020 पासून वरिष्ठ वेतनश्रेणी देणे सुरू आहे.परंतु श्रीम. पिंगला गिरधर रावताळे ह्या आदिवासी समाजाच्या महिला शिक्षिका असल्यामुळे व श्री.सुशिलकुमार पावरा यांच्या पत्नी असल्यामुळे शिक्षण विभागातील काही दोषारोपित कर्मचारी व अधिकारी यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी सुडबुद्धीने प्रस्ताव गायब करण्याचे व वेतनश्रेणीचा लाभ मिळू नयेत, म्हणून श्री.वामन जगदाळे हे काम करत आहेत. म्हणून शिक्षणाधिकारी वामन जगदाळे यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा,अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

Post a Comment

0 Comments