Advertisement

मोखाडा येथील जिल्हा परिषद कोचाळे येथे शाळा पुर्व तयारी मेळावा

पालघर प्रतिनिधी:सौरभ कामडी

मोखाडा येथील जिल्हा परिषद पालघर येथे शाळा पुर्व तयारी मेळावा उत्साहात साजरा करण्यात आला.
                       सर्वप्रथम गावचे सरपंच हनुमंत फसाळे यांनी सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हारअर्पण केले व सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सुद्धा सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन केले. शाळा 
 सकाळी रांगोळी फुग्यानी छान शाळा सजवून लेझिम च्या तालावर दाखलपात्र विद्यार्थ्यांची गावभर मिरवणूक काढण्यात आली . शाळेच्या प्रांगणात आल्यानंतर गावच्या सरपंच हनुमंत फसाळे यांनी सर्व दाखल पात्र विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देवून विद्यार्थी यांचे स्वागत केले . विद्यार्थ्यांच्या हस्ते रिबीन कापून मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले . विद्यार्थ्यांचे औक्षण करून प्रत्यक्ष मेळाव्यास सुरुवात झाली . शाळापूर्व तयारी मेळाव्या निमित्त जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था पालघर चे विषय सहाय्यक श्री. तानाजी डावरे सर यांनी सुरुवाती पासून तर शेवटपर्यंत मेळाव्यात सक्रिय सहभाग नोंदवून माता पालक गटांना मार्गदर्शन केले .
 माता पालक गटाची सभा घेवून श्री. डावरे सरांनी माता पालकांचे मनोगत , समस्या आणि आपेक्षा जाणून घेतल्या . तसेच कार्यक्रमाला उपस्थित वाकडपाडा बिटाचे बीट विस्तार अधिकारी मा. नंदकुमार वाघ , किनिस्ते केंद्राचे केंद्रप्रमुख मा. वीरकर साहेब व मोठ्या प्रमाणात पालक वर्ग ,ग्रामस्थ, उपस्थित होते . मेळाव्याची तायारी मुख्याध्यापक श्री. दिनकर फसाळे यांच्या मार्गदर्शनाखाली सह शिक्षक राजाराम जोशी, गणेश वाघ व दिनेश ठोमरे यांनी उत्तम प्रकारे केली होती................

Post a Comment

0 Comments