बिरसा फायटर्सचे जिल्हाधिकारी व तहसीलदार यांना निवेदन
दापोली: रत्नागिरी जिल्ह्यात जलजीवन मिशन प्रबावीपणे राबविण्यात यावे.रत्नागिरी जिल्ह्यातील आदिवासी बांधवांना अजूनही पाण्यासाठी वनवन भटकावे लागत आहे.गरीब व आदिवासीपर्यंत पाणी पोचवा, अशी मागणी बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी जिल्हाधिकारी एम.देवेंदर सिंह यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.या मागणीचे निवेदन दापोलीचे तहसीलदारांमार्फत जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
'हर घर जल' या संकल्पनेतून जलजीवन मिशनच्या माध्यमातून गांवातील प्रत्येक घरात,शाळा व गावातील सार्वजनिक ठिकाणी पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सुरवात करण्यात आली आहे.जिल्ह्य़ात अनेक ठिकाणी कामांना सुरुवातही झाली आहे.परंतु अनेक तालुक्यात जलजीवन मिशनच्या कामावरून तालुकास्तरीय सभेत मोठा गदारोळ होत आहेत.भांडणाच्या तक्रारी पोलीस ठाण्यापर्यंत जात आहेत. या तक्रारीत सर्वे न करता कुठेही मनमानी काम करणे, एका गावात एकाच ठिकाणी 200 फूट बोअर करतात,तर दुस-या गांवात 300 फूट बोअर करतात. गावात दोन टाक्या असताना फक्त एकच टाकी बसवणे,एक वर्षही टिकणार नाही अशा निष्कृष्ट दर्जाचे नळी,पाईप व इतर साहित्य वापरण्यात येत आहेत. तसेच ठराविक वार्डात कामे केली जात आहेत.
या अगोदरही जिल्ह्यात आरोग्य, शिक्षण,बांधकाम, घरकुल व विविध कल्याणकारी योजनेत बोगस व कामे न करता परस्पर अनुदान, निधी हडप केल्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. त्यासाठी संबंधित यंत्रणेला पारदर्शक व चांगल्या प्रतीची कामे करण्यासाठी सूचित करण्यात यावे.कल्याणकारी योजना गरीबांपर्यंत प्रभावीपणे राबविल्या गेल्या पाहिजेत,यासाठी सर्वांनी लक्ष देणे गरजेचे आहे.जलजीवन मिशन योजने अंतर्गत गरीबांपर्यंत पाणी पोहचले पाहिजे,म्हणून ही योजना प्रभावीपणे राबविण्यात यावी,अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेने जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0 Comments