Advertisement

पारधी समाज व जय रावण प्रतिष्ठान तर्फे आद्य क्रांतिवीर समशेरसिंग पारधी प्रतिमा पुजन करण्यात आले

शिरपुर:-समशेरसिंग पारधी हे आदिवासी पारधी समाजाचे क्रांतिकारक होते इंग्रजांविरुद्ध झालेल्या १८५७ च्या लढाईत त्यांनी स्वतःच्या पारधी समाजाचे नेतृत्व केले होते द्वारकेच्या ओखा बेटावर वाघरी , वाघेर जमातीचे लोक राहत होते त्यांचे स्वताचे संस्थान होते या संस्थांनसाठी गायकवाड , इंग्रज व वाघेर यांच्यात १८०३ ते १८५८ पर्यंत संघर्ष सुरू होता १८५८ मध्ये वाघेरानी इंग्रजांचे जहाज लुटले होते इंग्रजांनी त्यांचा राजा नारायण माणेक ची हत्या केली १८४८ मध्ये पुन्हा वाघेर व जोधा माणेक यांनी ते बेट इंग्रजांच्या ताब्यातून परत घेतले नंतर पुन्हा इंग्रज व गायकवाड यांनी जोधा माणेक ला मारून बेट ताब्यात घेतले १८१८ मध्ये वयाच्या अवघ्या २० व्या वर्षी समशेरसिंग पारधी यांनी स्वतःचे स्वतंत्र संस्थान बनवले होते राजा गंगू बापू मकवाना , माणेक वाघेर , वाघरी सेनापती यांची सोमनाथ जवळ मिठापुर येथे स्वराज्य साठी बैठक घेतली मराठा व इंग्रजांप्रमाणे स्वतंत्र संस्थान निर्माण केले समशेरसिंग जवळ ४ ते ५ हजार पारधी समाजाचे सैनिक होते पारधी , फासेपारधी , वाघेर , काठेवाडी समाजाचे लोक त्यांना मुखीया मानायचे इंग्रजांनी हल्ला केल्यानंतर समशेरसिंग यांच्याजवळ बंदुका नव्हत्या तरी दगड , भाले , काठ्या , तिर , झाडाच्या फांद्यांनी इंग्रजांशी लढाई केली होती इंग्रजांविरुद्ध आपला टिकाव लागणार नाही हे माहीत असतानाही त्यांनी प्रखर भाषण करून स्वतंत्र संस्थांनचे विचार मांडून १ जानेवारी १८५७ ला काठेवाडी मध्ये बैठक घेऊन रणनीती आखली व लोक गोळा करून "जिवमं ,जीवछं ततपर लढो ,देवींना कृपेथी आपळच लढाई जिकणारा छं , आपळ स्वतानु राज्य मळसे " असे युद्धाचे आवाहन केले जानेवारीत इंग्रजांनी द्वारकेवर बंदूक तोफांसह हल्ला केला तेव्हा गायकवाडाची एक टोळी समशेरसिंगला मिळली आणि समशेरसिंगने बंदूक तोफा याना न घाबरता इंग्रजांवर समुद्रात बुडून , पपईच्या झाडाची पोकळ फांदीने श्वास घेऊन पाण्यात राहून , कधी बेटावरून फास टाकून तर कधी झाडांवरून हल्ले करून परेशान करून टाकले पत्नी , भाऊ , मुलगा मारला गेल्या नंतरही हतबल न होता ,तलवार ,बाण , भाला , दगडे मारून हल्ले केले १८५८ ला त्याला व गंगू बापू मकवना , वाघेरा माणेक याना इंग्रजांनी पकडून १ एप्रिल १८५८ रोजी क्रांतिवीर समशेरसिंग पारधी यांना फाशी दिली 
तरी आज शिरपुर येथे पारधी समाज सभागृह येथे आद्य क्रांतिकारी समशेरसिंग पारधी यांना त्रिवार अभिवादन देण्यात आले व प्रतिमा पुजन करून कार्यक्रम संपन्न झाले त्या वेळी उपस्थित आकाश पारधी,हिम्मत दाभाडे , सागर पारधी,विशाल पारधी,निलेश दाभाडे,विजय पारधी,प्रमोद भोई,हर्षल भोई आदी उपस्थित होते या कार्यक्रमाचे आयोजन जय रावण प्रतिष्ठाण राज्यसहसचिव आकाश पारधी यांनी केले

Post a Comment

0 Comments