Advertisement

बिरसा फायटर्समुळे रस्त्यांची कामे होतायेत फटाफट!

खड्ड्यांचा रस्त्याबाबतच्या बिरसा फायटर्सच्या निवेदनाची तहसीलदारांकडून दखल

 उपविभागीय अधिकारी व उप अभियंता यांना दिले निर्देश


दापोली: जालगांव ग्रामपंचायत हद्दीला लागून असणारा दापोली हून विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटरचा खड्ड्यांचा रस्ता तात्काळ डांबरीकरण करून दुरूस्त करावा,अशा मागणीचे निवेदन सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी तहसीलदार दापोली यांच्याकडे दिनांक 31/03/2023 रोजी दिले होते.त्या निवेदनाची दखल दापोलीच्या तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी यांनी घेतली आहे.उपविभागीय अधिकारी,सार्वजनिक बांधकाम उपविभाग दापोली व उप अभियंता जिल्हा परिषद बांधकाम विभाग दापोली यांना दिनांक 10/04/2023 रोजीच्या पत्राद्वारे रस्त्याच्या दुरूस्तीबाबत अहवाल सादर करण्याचे निर्देश तहसीलदार दापोली यांनी दिले आहे.
                तहसीलदार यांच्या पत्रात म्हटले आहे की, ग्रामपंचायत जालगांव हद्दीला लागून असणारा दापोली हून विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटरचा रस्ता खूपच खड्डेमय झाला आहे.रस्त्यात खड्डा की खड्ड्यात रस्ता हे कळत नाही.सदर रस्ता कृषी विद्यापीठ दापोलीला लागून असून लोकांचे मोठ्या प्रमाणात रोजच येणे जाणे होते.सदर रस्ता कृषी विद्यापीठ दापोलीने ग्रामपंचायत जालगांव कडे वर्ग केल्याचे समजते.सदर रस्ता वर्षानुवर्ष दुर्लक्षित आहे.गणेशोत्सव च्या कालावधीत लोकांना दाखविण्यासाठी रस्त्यावर डबर-माती टाकून तात्पुरत्या स्वरूपात खड्डे बुजवले जातात. गणेशोत्सव संपल्यानंतर रस्त्याची अवस्था जैसे थे होते. रस्त्यावर मोठ मोठाले खड्डे झाले आहेत.रस्त्याची खूपच दुरावस्था झाली आहे.रस्यावर मोठे वाहन आले की,प्रचंड मातीचा धुराळा उडून रस्ता अंधारमय होतो.मातीचा धुराळा वाटसरू व वाहनचालकांच्या नाकात व डोळ्यात जाऊन त्रासदायक होतो.या रस्त्यावर दुचाकी चालकांचे अपघात सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.
                     जालगांव मध्ये राहणारे अनेक प्रतिष्ठित व मोठ्या पदावर असणारे व्यक्ती याच मार्गाने रोजचे ये जा करतात. तरीही हा रस्ता दुरुस्त का केला जात नाही?या रस्त्याचा कोणी वाली नाही का? हा रस्ता एवढा खड्डेमय झाला आहे तरी दूर्लक्षित का? असा प्रश्न जालगांव पांगारवाडीतील नागरिक उपस्थित करीत आहेत.सदर रस्त्याची खूपच दयनीय स्थिती निर्माण झाली आहे.वाहनचालक खड्डेमय रस्त्यामुळे त्रस्त झाले आहेत. 
 म्हणून दापोली पासून विद्यानगर नर्सरी रोड पांगारवाडी कडे जाणारा 500 मीटर मधला रस्ता तात्काळ डांबरीकरण करून दुरूस्त करण्यात यावा.अशी मागणी बिरसा फायटर्स संघटनेकडून प्रशासनास करण्यात आली आहे.रस्ता दुरुस्त न केल्यास बिरसा फायटर्स संघटनेकडून रस्याच्या खड्यासमोरच घंटानाद आंदोलन छेडण्यात येईल, असा उल्लेख अर्जात करण्यात आला आहे. 
            तरी सदरचा अर्ज आपल्या विभागाशी निगडीत असल्यामुळे योग्य ती कार्यवाही करून संबंधितांना आंदोलनापासून परावृत्त करावे.तसा अहवाल कार्यालयास अवगत करावे.या उपरही संबंधितांनी आंदोलन केल्यास कायदा व सुवस्था भंग झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी तुमची व तुमच्या कार्यालयाची राहील याची नोंद घ्यावी.सोबत अर्जाची प्रत पाठविण्यात येत आहे.
          या आशयाचे पत्र दापोलीचे तहसीलदार यांनी ग्रामपंचायत जालगांव चे सचिव तथा ग्रामसेवक व बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांना माहितीसाठी व योग्य त्या कार्यवाहीसाठी पाठवले आहे.या रस्त्याकडे प्रशासन व लोकप्रतिनिधींकडून वर्षानुवर्ष दूर्लक्ष होत होते.मात्र आता तहसीलदारांनी निवेदनाची दखल घेत बांधकाम विभागाला निर्देश दिल्यामुळे हा आपला रस्ता दुरुस्त होईल ,अशी आशा जालगांव पांगारवाडीतील रहिवाशी करीत आहेत.

Post a Comment

0 Comments