Advertisement

विविध योजनांच्या माध्यमातून जिल्हा विकासाकडे वाटचाल.


🔷 जिल्हा प्रशासनाने राबविले उपक्रम. 

नागपूर / चक्रधर मेश्राम   दि. १३ एप्रिल २०२३:- 

गडचिरोली जिल्हा हा आदिवासी, दुर्गम, नक्षलग्रस्त, डोंगराळ आणि जंगलव्याप्त जिल्हा असून  या जिल्ह्यात विविध विकास योजना राबविण्यासाठी जिल्हा प्रशासनाला तारेवरची कसरत  करावी लागते. अशाही परिस्थितीत गडचिरोली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी संजय  मिना  यांच्या नियोजनबद्ध  कार्य कौशल्य पद्धतीने राज्य शासनाच्या आणि केंद्र शासनाच्या अनेकविध   विकास योजना यशस्वी करण्यात आल्या. त्यासाठी महसूल, पोलीस, आरोग्य, शिक्षण तसेच अनेक विभागाचे वेळोवेळी सहकार्य मिळाले.  सामुहिक वनहक्क प्राप्त ग्रामसभांना प्रशिक्षण देऊन एकल केंद्रातून त्यांच्या क्षमतांचा विकास करण्यात आला.  जिल्हा प्रशासना सोबत ५१३ ग्रामसभा संलग्नित करण्यात आल्या तर १३५  ग्रामसभामधि्ल ८२८ प्रतिनिधींना प्रशिक्षित करण्यात आले. सामुदायिक ग्रामसभांनी नरेंगा अंमलबजावणी यंत्रणा म्हणून नोंदणी करुन  ९ ग्रामसभांच्या माध्यमातून ७० हजार मनुष्यदिन काम तयार केले. किशोरवयीन मुला - मुलींना आरोग्य आणि स्वच्छतेचे महत्त्व पटवून देण्यासाठी आकांक्षित   जिल्हा कार्यक्रमातून  एज्युकेट गडचिरोली फेलोशिपच्या माध्यमातून दिशा आरोग्य विषयक पुस्तिकेच्या माध्यमातून  महत्त्वाची माहिती शालेय विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणेचा महत्वपुर्ण सहभाग होता.  फुलोरा शैक्षणिक क्षमता प्रकल्पाची योग्य रितीने अंमलबजावणी करुन साक्षरता आणि संख्याज्ञान  विकसित करण्यावर  अधिकाधिक भर देऊन  शैक्षणिक प्रवाहात स्थुलकारक, सामाजिक,, भावनिक, बोधात्मक, बोलीभाषा  साक्षरता आणि गणिती विकास  करण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यातील शेकडो  शाळांमध्ये उपक्रम राबविले. शासनाच्या विविध विकास योजना राबविण्यासाठी  गडचिरोली जिल्ह्यात नक्षल बाधित दुर्गम क्षेत्रात पोलीस विभागाचे वतीने  जात प्रमाणपत्र वाटप, आधार कार्ड , पॅन कार्ड  वाहन चालक परवाना, विमा  , रोजगार मेळावे, प्रशिक्षण  , शेती विषयक बि - बियाणे , सयंत्रांचे  वाटप  विविध  विभागाच्या सहकार्याने आयोजित करण्यात आले. याबरोबरच जिल्हा विकासासाठी  अनेकविध योजना राबविण्यात  येत आहेत.

Post a Comment

0 Comments