Advertisement

सुशिलकुमार पावरा यांचे सीईओ दालनासमोरच उपोषण

*पावरा आक्रमक; अधिका-यांना धरले धारेवर, पोलिसांची मध्यस्थी*

*शिक्षण विभागाला चूक लक्षात आली*

*डी.एड पेक्षा बी.एड पदवी मोठी*

*शिक्षणाधिकारी यांचे पावरा यांना लेखी पत्र* 

दापोली: आदिवासी शिक्षिकेला त्रास देणा-या वामन जगदाळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांना तात्काळ सेवेतून बडतर्फ करा व आपल्या प्रलंबित 28 मागण्यांसाठी सुशिलकुमार पावरा राष्ट्रीय अध्यक्ष बिरसा फायटर्स यांनी आपले 478 वे उपोषण मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांच्या दालनासमोरच छेेडले.पोलिसांनी सीईओ दालनासमोर उपोषण करू नका,आम्हाला तसे वरिष्ठांचे आदेश आहेत.तरी सुशिलकुमार पावरा यांनी सीईओ दालनासमोरच उपोषणास बसणार असल्याचे ठामपणे सांगितले.यावेळी काही वेळ वातावरण चांगलेच तापले होते.त्यानंतर शिक्षणाविभागाने सुशिलकुमार पावरा यांना चर्चेला बोलावले. उपशिक्षणाधिकारी सुनिता शिरभाते यांनी संबंधित टेबलावरील क्लार्कला बोलावून मागण्यांबाबत सुशिलकुमार पावरा यांची समजूत घातली व लेखी पत्र देत उपोषण मागे घेण्याची विनंती केली.माझ्यावर झालेल्या अन्यायाच्या प्रकरणात माझ्या पत्नीला विनाकारण टार्गेट करू नका.लढायचे असेल तर माझ्यासोबत लढा.माझ्या पत्नीला त्रास देण्याचा प्रयत्न केला तर असेच मी सीईओ दालनासमोरच उपोषणास बसेन.असे अधिकारी व कर्मचाऱ्यांना ठणकावून सांगितले.
                   श्रीम. पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षका यांचा प्रस्ताव डी.एड.चे कारण दाखवून अपात्र ठरविण्यात आला होता.परंतु
त्यांचे शिक्षण नोकरी लागण्यापूर्वीच म्हणजे 2007 पूर्वी बी.एडही आहे. त्यांची सेवा सन 2007 ते 2019 या कालावधीत 12 वर्षे पूर्ण होते ,म्हणून शासन निर्णयानुसार 2019 पासून वरिष्ठ वेतनश्रेणी देण्यात येईल.शिक्षण विभागाला चूक लक्षात आली.गटशिक्षणाधिकारी यांचेकडून आवश्यक कागदोपत्र मागवून प्रस्तावावर कार्यवाही करण्यात येऊन वरिष्ठ वेतनश्रेणी देण्याचा निर्णय घेण्यात येईल.असे लेखी पत्र शिक्षणाधिकारी प्राथमिक यांनी सुशिलकुमार पावरा यांना दिले आहे. 
                      श्रीमती पिंगला गिरधर रावताळे उपशिक्षिका यांच्या बॅचमधील बी.एड. व डी.एड. समान पात्रताधारक व समान नोकरीची सुरुवात झालेल्या सर्व शिक्षकांना सन 2019 पासून वरिष्ठ वेतनश्रेणी देणे सुरू आहे.परंतु श्रीम. पिंगला गिरधर रावताळे ह्या आदिवासी समाजाच्या महिला शिक्षिका असल्यामुळे व श्री.सुशिलकुमार पावरा यांच्या पत्नी असल्यामुळे शिक्षण विभागातील काही दोषारोपित कर्मचारी व अधिकारी यांना कारवाईपासून वाचविण्यासाठी सुडबुद्धीने प्रस्ताव गायब करण्याचे व वेतनश्रेणीचा लाभ मिळू नयेत, म्हणून वामन जगदाळे हे काम करत आहेत. असा आरोप सुशिलकुमार पावरा यांनी करीत डी.एड.व बीएड मधला फरक समजावून सांगितला.
          माझी 2 मूळ कागदपत्रे 2 लाख दंडाच्या रकमेसह परत करा,दोषी ठरलेल्या विजय दाजी बाईत व बोगस डिग्रीधारक नंदलाल कचरू शिंदे शिक्षण विस्तार अधिकारी खेड तसेच 31 दोषारोपित एकनाथ आंबोकर तत्कालीन शिक्षणाधिकारी यांच्यावर कारवाई करा,अशी मागणी सुद्धा सुशिलकुमार पावरा यांनी रेटून धरली.परंतु आम्ही नवीन अधिकारी आहोत, आम्हाला मागील प्रकरणाची माहीती नाही,माहिती करून घेतल्यानंतर कार्यवाही करू,असे आश्वासन शिक्षण विभागाकडून देण्यात आले.

Post a Comment

0 Comments