Advertisement

स्थानिकांनचा फक्त नोकरी मिळावी,ही मागणी चूकीची: सुशिलकुमार पावरा

लायक उमेदवार महाराष्ट्रात कुठेही नोकरी करू शकतो

अखंड महाराष्ट्राच्या एकतेला धोकादायक, आपसात भांडणे लावणारी व भेदभाव करणारी मागणी

रत्नागिरी: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात शिक्षक,ग्रामसेवक, तलाठी,आरोग्य सेवक नोकर भरतीत स्थानिकांनाच प्राधान्याने नियुक्त करण्यात यावे,अशी मागणी रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही राजकीय पक्षाचे नेते व संघटनांचे पदाधिकारी सातत्याने करत आहेत.मूळात ही मागणीच चूकीची व अखंड महाराष्ट्राच्या एकतेला धोकादायक अशी आहे.पात्रताधारक, लायक,गुणवत्ताधारक उमेदवार महाराष्ट्रात कुठेही नोकरी करू शकतो.तसेच शासनाकडून नोकरभरती ही सर्व समाजघटकांना विचारात घेऊन व नियमानुसार केली जाते.असे मत बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले आहे.
               परजिल्ह्यातील उमेदवारांना नियमानुसार रिक्त पदांवर नियुक्त केल्यास उमेदवारांना शाळेत रूजू होऊ देणार नाही,शाळाच बंद पाडू,अशी समाजकंटकांनी शासनाला दिलेली धमकी ही एक दादागिरी व गुंडगिरीच आहे.आंतरजिल्हा बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त करू नका,अशीही मागणी केली जात आहे.बदली झालेल्या शिक्षकांना कार्यमुक्त केले नाही तर रिक्त जागा होणार नाहीत व दिसणारही नाहीत. त्यामुळेच रिक्त जागा नसतील तर नोकर भरती होणार नाही.बदली व नोकरभरती ही साततत्याने चालणारी शासनाची प्रक्रिया आहे.म्हणून रिक्त जागाही नियमानुसार भरण्यात याव्यात व बदलीपात्र उमेदवारांनाही कार्यमुक्त करण्यात यावे.
                       शिक्षक बदल्यांमुळे विद्यार्थांचे नुकसान होत असेल तर शिक्षकांच्या बदल्याच करू नयेत.केवळ बदल्यांचे कारण दाखवून नोकर भरतीत फक्त स्थानिकांनाच नियुक्त करण्यात यावे,परजिल्ह्यातील उमेदवारांना नियुक्त करू नये,ही मागणी म्हणजे अखंड महाराष्ट्राला तोडण्यासारखी व भेदभाव करण्यासारखी आहे.महाराष्ट्रातील जनतेत व बेरोजगार उमेदवारांत आपसात भांडणे लावणारी ही मागणी आहे.असे परखड मत सुशिलकुमार पावरा यांनी व्यक्त केले आहे.

Post a Comment

0 Comments