Advertisement

श्रीमती रंजना जोशी यांनी केले मोहफुला पासुन विविध पौष्टिक पदार्थ

 
पालघर प्रतिनिधी - सौरभ कामडी
मोखाडा - कला म्हटल्यावर मेहनत घ्यावी लागते आणि या मेहनती शिवाय यश प्राप्त करता येत नाही आणि त्या यशा मधून विविध गोष्टी आपण प्राप्त करत असतो आणि आपल्याला त्यामधून योग्य पद्धतीने मोबदला मिळत राहतो तसेच या मेहनतीने आपण टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू बनवत राहतो कधी लाकडी त्याच प्रमाणे कधी काही वस्तू पासून खाण्याचे पदार्थ सुद्धा योग्य रीतीने बनवत असतो अश्याच प्रकारे मोखाडा तालुक्यात उधळे वाकडपाडा ग्रामपंचायत मधील आदिवासी महिला सौ रंजना जोशी यांनी मोह फुला पासुन,चटणी,मणुका,लाडु तयार केले असुन हे पदार्थ खुप चविष्ट आहेत, शिवाय पौष्टिक आहार म्हणून देखील खाण्यासाठी उपयुक्त आहेत, तसेच त्यांनी नागली पासून देखिल विविध पदार्थ तयार केले आहेत,पापड,लोणचे असे पदार्थ देखील तयार करून विक्री करत आहेत.
रंजना जोशी ह्या खाद्यपदार्थ बरोबरच गवता पासून टोपली, टोपी , आकर्षक वस्तू तयार करतात,या वस्तु देखील त्यांनी विक्री साठी ठेवल्या आहेत.
श्रीमती जोशी ह्या बचत गटाच्या माध्यमातून महिलांना सोबत घेऊन या सर्व वस्तू तयार करतात, त्यामुळे त्यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.
श्री प्रदीप वाघ उपसभापती यांनी देखील जोशी यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन केले आहे, तसेच पालघर सरस किंवा अन्य ठिकाणी आपन स्टॉल लावून हे पदार्थ जनतेला उपलब्ध करून दिले तर लोकांची मागणी वाढेल व आपल्या या व्यवसायाला चालना मिळेल अशी अपेक्षा श्री प्रदीप वाघ यांनी व्यक्त केली आहे.
सरपंच लता वारे, उपसरपंच नंदकुमार वाघ, पोलिस पाटील विठ्ठल गोडे यांनी देखील श्रीमती रंजना जोशी यांच्या या व्यवसायाला चालना मिळाली पाहिजे त्यासाठी सहकार्य करणार असल्याचे सांगितले आहे.

आदिवासी महिला सौ रंजना जोशी यांनी गवता पासून विविध वस्तू, तसेच नागली मोहफुले या पासुन खुप छान पदार्थ तयार केले असुन.शासनाने आदिवासी महिलांच्या या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून द्यावी.
      श्री प्रदीप वाघ
उपसभापती पंचायत समिती मोखाडा

Post a Comment

0 Comments