Advertisement

त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत चंद्राची मेट येथील ग्रामपंचायत प्रशासनाचा अजब कारभार

त्रंबकेश्वर तालुक्यातील पेसा ग्रामपंचायत चंद्राची मेट या गावातील ग्रामपंचायत प्रशासन मनमानी पद्धतीने कारभार करत असून ग्रामस्थांना वेठीस धरत आहे.काल दिनांक 28 मार्च 2023 रोजी ग्रामसभेची बातमी कव्हर करण्यासाठी तेथील ग्रामस्थांनी पत्रकार संतोष विधाते यांना बोलावले असता तेथील इसम नामे अशोक धोंडू चंद्रे व राजेंद्र पांडुरंग चंद्रे यांनी पत्रकार संतोष विधाते व्हिडिओ काढण्यासाठी विरोध केला व चक्क अशोक धोंडू चंद्रे हे तर दक्ष न्यूजच्या प्रतिनिधी यांच्या अंगावर धावून गेले व पत्रकाराला त्यांच्या कर्तव्यापासून रोखन्याचा प्रयत्न केला. ग्रामपंचायतचे ग्रामसेवक हे सरकारी दस्तावेज सोबत आपल्या घरी घेऊन जातात असा ग्रामस्थांचा आरोप होता संबंधित ग्रामसेवक हे अर्धवट ग्रामसभा सोडून निघाले असता ग्रामस्थांनी त्यांची बॅग दाखवा असे विचारणा केली असता ग्रामसेवक यांनी सांगितले सदर माझी खाजगी कागदपत्रे आहेत परंतु सदर बागेमध्ये ग्रामस्थांनी चेक केले असता ग्रामपंचायतीचे कोरे उतारे, ग्रामपंचायतचे चेक बुक, लेटरहेड, दलित वस्ती योजनेचे पासबुक, काही खाजगी दुकानांची कोरी बिले व इतर दस्तऐवज आढळून आले व ग्रामस्थांनी सदर ग्रामपंचायतचे दस्तावेज आपण घेऊन जाऊ नये असे सांगत असतानाच ग्रामसेवक तेथून त्यांची बॅग सोडून निघून गेले. सदर घडलेल्या प्रकाराची वरिष्ठ अधिकारी व पोलीस प्रशासन यांनी चौकशी करून संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी ग्रामस्थ पत्रकार यांच्याकडून केली जात आहे, संबंधित पत्रकार यांनी घोटी पोलीस स्टेशनमध्ये तसा अर्ज केला आहे

Post a Comment

0 Comments