Advertisement

जुन्या पेन्शनमुळे सरकारचा फायदा,नुकसान नाही: सुशिलकुमार पावरा

मुख्यमंत्र्यांना बिरसा फायटर्सने सादर केले परिगणना पत्रक

दापोली:कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू केल्यानंतर सरकारच्या तिजोरावर भार पडत नाही,नुकसान होत नाही तर फायदाच होतो,हे पटवून देणारे परिगणना पत्रक बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.जुन्या पेन्शनसाठी सरकारी कर्मचाऱ्यांनी सात दिवस बेमुदत संप केला,आंदोलन केले.त्यावर माझा असा दावा आहे की,1 नोव्हेंबर 2005 रोजी व नंतर नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांना
जुनी पेन्शन योजना लागू केल्यावर सरकारच्या तिजोरीवर भार पाडत नाही,तर प्रति कर्मचारी दरमहा सरासरी 40,000 रूपये सुरवातीचे मूळ वेतन गृहीत धरुन वर्तमान एन पी एस योजनेनूसार 28 वर्षे सेवा कालावधीचे परिगणना पत्रक सोबत जोडले आहे.
          त्यानुसार कर्मचाऱ्यांचे 10 टक्के अंशदान व शासनाचे 14 टक्के अंशदान या रकमेची 6 टक्के व्याज दराचे 1 वर्षाचे आर डी मूल्य व त्याची पुढील उरलेल्या सेवाकालावधीसाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक केवळ 10 टक्के परतावा गृहीत धरला तरी माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कथन केल्यानूसार मागील 7 वर्षात सरासरी 11 टक्के उत्पन्न मिळाले आहे.एकुण जमा रक्कम 3,47,48,052 रूपये इतकी रक्कम होते.यापैकी 40 टक्के रक्कम 1,38,99,221 रूपये इतकी सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना परत केल्यानंतरही पुढील म्युच्युअल फंड गुंतवणूकीसाठी 2,08,48,831 रूपये इतका निधी जमा राहतो.त्यानुसार 3,72,30,811 रूपये सरकारच्या तिजोरीत भर पडतो.
            म्हणून शासनाने जुनी पेन्शन मंजूर करून कर्मचारी कुटुंबाचे वार्ताहत थांबविण्यासह सामाजिक सुरक्षितचे पुण्य पदरी पाडून घ्या.भिक नको मागतो आमचेच दाम,असे परिगणना पत्रक सुशिलकुमार पावरा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवले आहे.

Post a Comment

0 Comments