Advertisement

बिरसा फायटर्स,अखिल भारतीय आदिवासी विकास युवा परिषद, तर्फे निवेदन सादर.


पञकार परिषदेत ठानेदार थोरात पो.स्टे.साकोलीकडे आदिवासी संघटणाची न्यायाची मागणी

सावरबंध घटना आ.अन्यायग्रस्त आदिवासी जमिन मालक  व परिवार भुमिगत, 

*एसके जी पंधरे राज्य प्रतिनिधी*तथा ITN*

साकोली:-(२३ मार्च) साकोली पोलीस स्टेशन ठानेदार यांना बिरसा फायटर्स,अखिल भारतीय आदिवासी परिषद पदाधिकार्यांचे नेतॄत्वात न्याय मागणीस निवेदन सादर केले याप्रसंगी विनोद वट्टी जिल्हा.अध्यक्ष संभाजी ब्रिगेड, युवा परिषद,व प्रमोद वरठे जिल्हा भंडारा उपाध्यक्ष बिरसा फायटर्स, भाऊराव कुंभरे, माजी उपसरपंच सिरेगावटोला,जयपाल पंधरे, हिरामन पंधरे,परसराम कंगाले, निलमचंद कुंभरे,रवि सरोते,वसंता मेश्राम,देवचंद वाडवे,तर बि एस सयाम माजी अध्यक्ष भंडारा, हे उपस्थीत होते.घटणा असी की  दि.८/११/२०२२ रोजी आरोपी विलास बडवाईक व सहा जना विरोधात जमिन बळकावल्या प्रकरणी अँट्रोसिटी अंतर्गत नोंद झाला होता नंतरही अन्यायग्रस्त शालु पंधरे व कल्पणा  वाडवे या बहिनींनी पो स्टेशनचे तत्कालीन ठानेदार जितेंद्र बोरकर यांनी मानसिक ञास दिला यामुळेच दिलासा रन मिळाल्यामुळे कर्ज बाजारी पंधरे व वाळवे भगीनींनी दि १३/०३/२३ ला  कुटुंबियासह आत्मदहनाचे नोटीस प्रशासन व   बिरसा फायटर्स वए बि ए व्ही व प्रसार माध्यमांना दिले तोवर कोनतीच कार्यवाही झाली नाही त्यामूळे आत्मदहनाची सुचना दिल्याने पोलिस प्रशासन जागे झाले पण अन्यायटग्रस्तास न्याय मिळाले नाही तत्कालीन ता.भुमि अभिलेखाची बनावट " क "प्रत, तहसील साकोली यांचे स्वार्थीपणा मुळे अभिप्रेत न्याय मिळाला नाही भष्ट्राचारी शासन व शासकीय भ्रष्ट व्यवस्थेला कंटाळुन आदिवासी कुटुंब भुमिगत झाले त्याची दखल घेवून दि.२० मार्च ला सुरेशकुमार पंधरे,विनोद वट्टी, प्रमोद वरठे, गुलाब उईके व बिरसा फायटर्सचे पदाधिकारी भेटी दरम्यान हजर होते व शासनाला स्मरण देवूनही कार्यवाही झाली नाही याविवंचने त पञकार परिषद घेवून त्या ६  सावरबंदच्या आरोपीस अटक करावी. जमिनीवर ताबा मिळवून देण्याची मागणी केली जर तसे न झाल्यास आंदोलन करू असा सज्जड दमदार ईशारा संघटनेच्या निवेदनातून दिलेला आहे

Post a Comment

0 Comments